लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: येथील पूर्व भागातील काटेमानिवली भागात समोसा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेचा याच भागातील एका ३६ वर्षाच्या इसमाने बुधवारी रात्री विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष तिवारी उर्फ मंडा (३६) असे आरोपीचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील नाना पावशे चौकातील मुमताज निवासमध्ये राहतो. तीन वर्षापूर्वी आरोपी संतोषने या महिलेचा विनयभंग केला होता. त्यावेळी या महिलेने या विषयाकडे दुर्लक्ष केले होते. पोलिसांनी सांगितले, काटेमानिवली भागातील एक ५० वर्षाची महिला आपल्या कुटुंबासह काटेमानिवली भागात राहते.

हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या डेक्कन क्वीनमधून उतरताना तीन प्रवासी पडले; एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती याच भागात समोसा विक्रीचा व्यवसाय करते. कामावर गेलेल्या मुलीला घरी येण्यास उशीर झाला म्हणून तक्रारदार महिला बुधवारी रात्री आपल्या घराच्या समोरील भागात मुलीची वाट पाहत उभी होती. यावेळी आरोपी संतोष दुचाकीवरुन या महिलेजवळ येऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संतोष तिवारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.