कल्याण : एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये रविवारी घडली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संजय बनसोडे (४५) या इसमाला अटक केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण जवळील मोहने येथे १४९ वीज चोरांवर कारवाई; ४१ लाखाची वीज चोरी उघड

हेही वाचा >>> ठाणे: अमली पदार्थाची तस्करी बंद केल्याने एकाच्या हत्येचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिमेत कुटुंबीयांसह राहते. रविवारी ती आपल्या घराच्या परिसरात खेळत असताना संजय बनसोडे याने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरात बोलून घेतले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संध्याकाळी या मुलीच्या पोटात दुखू लागले. तिने याबाबत आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकुन पीडित मुलीच्या कुटुंबाने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत संजय बनसोडे याला केली आहे. आरोपी बनसोडे याला सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.