ठाणे – जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवण्या तसेच ज्या परिसरात दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थ्यांनींची ये-जा होते, अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याच्या सूचना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या ठिकाणी बिट मार्शल, साध्या गणवेशातील पोलीस आणि महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे  छेडछाड तसेच इतर गुन्ह्यांना आळा बसेल. असेही शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे शहर पोलीस आयुक्तलयात शंभूराज देसाई यांनी महिला सुरक्षा संदर्भात शनिवारी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा >>> Video : तरुणीचा विनयभंग करून तिला रिक्षासह फरफटत नेणाऱ्या आरोपीला अटक, व्हिडीओ व्हायरल!

ठाणे रेल्वे स्थानक येथील बाजारपेठेत एका २१ वर्षीय मुलीचा रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला होता. या घटनेत तरुणीने रिक्षा चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही नंतर त्या तरुणीला फरफटत नेले, यामुळे तिला दुखापत देखील झाली. यातील रिक्षाचालक आरोपी काटीकादाला विरांगनेलू (३६) याला नवी मुंबईतील दिघा येथून शनिवारी त्याला अटक केली. मात्र या घटनेमुळे ठाण्यासारख्या मोठ्या शहरात देखील महिला आणि विद्यार्थिनींचा सुरक्षितेतचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे ठाणे शहर पोलीस आयुक्तलयात महिला सुरक्षा संदर्भात शनिवारी एक आढावा बैठक घेतली. यावेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कृती आराखड तयार करण्याचे तसेच विविध उपायोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. तर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवण्या तसेच ज्या परिसरात दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थ्यांनींची ये-जा होते, अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> भिवंडीत वीज पडून दोन तरुणींचा मृत्यू; दोन जण जखमी

या ठिकाणी बिट मार्शल, साध्या गणवेशातील पोलीस आणि महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे सराईत गुन्हेगारांना प्रतिबंध घालता येणार आहे. असे देसाई यांनी वेळी स्पष्ट केले. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाचा ११२ या क्रमांकावरील प्रतिसादाचा वेळ हा राज्यात सर्वात अधिक असु पाच मिनिटांच्या आत पोलीस घटनास्थळी पोहचतात. असेही ते म्हणाले. तसेच पोलीस यंत्रणेत मनुष्यबळ कमी असल्याने राज्य शासनातर्फे पोलीस भरती करणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. तर ठाणे पोलीस यंत्रणेकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची कमतरता असल्याने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यास त्यांना लवकरच राज्यशासनाला निधी उपलब्ध करून दिला. तसेच तो पर्यंत जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तर ठाण्यातील रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याची व जादा प्रवासी वाहतूक करत असल्याच्या प्रश्नांवर पोलीस दल व परिवहन विभागाची समन्वयाने कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर राज्यगृहमंत्री असताना सातारा येथे महिलांच्या सुरक्षेसाठी काही योजना आखण्यात आल्या होत्या. त्याच पद्धतीच्या योजना ठाण्यासह इतर जिल्ह्यांतही राबविण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी पोलीस आयुक्त जय जित सिंह, सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेश जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काही काळ वाहतूक कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री यांच्या वाहनांचा ताफा कोर्ट नाका परिसरातील ठाणे शहर पोलीस आयुक्तलयातच्या आवारात काही काळ असल्याने कोर्ट नाका, जांभळी नाका तसेच काही अंतरावर असलेल्या गोखले रोड परिसर येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती