अंबरनाथ – लोणी खाणाऱ्या व्यक्तीला खालच्या थराचा विसर पडला आहे. हंडी फोडण्यासाठी खालचा थर मजबूत लागतो हे विसणाऱ्याला त्याची जागा लवकरच दाखवली जाईल. येत्या दोन महिन्यात लवकरच एक हंडी फोडायची आहे, यासाठी तयार राहा, असे वक्तव्य अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी मंगळवारी दहीहंडी कार्यक्रमात केल्याने चर्चांना उधान आले आहे.  अंबरनाथ शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि वाळेकर यांच्यातील अंतर्गत संघर्ष सर्वश्रृत आहे. त्यातच वाळेकरांचे हे विधान विधानसभेसाठी आमदार डॉ. किणीकर यांना आव्हानवजा इशारा असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील रुणवाल गार्डन, पलावा येथे वाहनांच्या काचा फोडल्या

Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
There is no anti encroachment team action of the Municipal Corporation against the welcome boards of CIDCO Chairman
सिडको अध्यक्षांच्या स्वागत फलकांनी बेलापूर विद्रूप; महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गप्प
eknath shinde shivsena s leaders marathi news
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सरकारी पदे; भाजप, अजित पवार गटाचे नेते दुर्लक्षित
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा
hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले

अंबरनाथ शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ.बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत संघर्ष सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष तीव्र झाला आहे. सुरूवातीला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणावरून तर शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यावरून हा संघर्ष पेटला होता. मध्यंतरीच्या काळात वाळेकर यांनी किणीकर यांचे नाव न घेता शेलक्या शब्दात टिका केली होती. त्यामुळे विधानसभेच्या पूर्वीच दोघांमधील संघर्ष पेटल्याचे चित्र होते. त्यातच आता दहीहंडी कार्यक्रमात वाळेकरांनी अशाच प्रकारे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा >>> माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराजा चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही अरविंद वाळेकरांच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दहीहंडच्या थरांवरून एक वक्तव्य केले आहे. लोणी खाणाऱ्या व्यक्तीला खालच्या थराचा विसर पडला आहे. हंडी फोडण्यासाठी खालचा थर मजबूत लागतो. पण हे विसणाऱ्याला त्याची जागा लवकरच दाखवली जाईल. येत्या दोन महिन्यात लवकरच एक हंडी फोडायची आहे. यासाठी तयार राहा आणि आपला खालचा थर मजबूत करा. तर हे जे विसरले आहेत त्यांना एकच सांगायचे आहे की आमचा नाद करायचा नाही, असा इशाराच यावेळी अरविंद वाळेकर यांनी दिला. शहरातील राजकीय वर्तुळात वाळेकर सहसा किणीकर यांच्यावरच टीका करतात. त्यामुळे ही टीकाही आमदार डॉ. किणीकर यांच्यावरच केली असल्याची चर्चा रंगली आहे.