मुंबईतील निर्मल नगर परिसरात आढळून आलेल्या बोगस शपथपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये छापे टाकून बोगस शपथपत्र शोधून काढावी. अशी मागणी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच शपथपत्र तयार करण्यासाठी नोटरीला १० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>> १५ दिवसांत अंबरनाथचा पाणी पुरवठा सुरळीत करा; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश, सत्ताधारी आमदारांच्या आंदोलनानंतर बैठक

मुंबईतील निर्मल नगर येथे जी बनावट शपथपत्र आढळून आली आहेत. त्यातील ९९.९९ टक्के लोकांनी ही शपथपत्र आमची नाहीत असे सांगितले आहे. ज्या नोटरीने ही शपथपत्र तयार केली आहेत. तो आता गायब झालेला आहे. त्याचा शोध घेऊन चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली. अशी बोगस शपथपत्र तयार करण्यासाठी त्या नोटरीला १० कोटी रुपये दिले आहे. असा आरोपही म्हस्के यांनी केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी बोगस शपथपत्र तयार झाली आहे. ही शपथपत्र ठाकरे गटाची असल्याने त्यांचा याप्रकरणी हात असावा असेही म्हस्के म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.