लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शहरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले विकास रेपाळे यांना अज्ञात व्यक्तीकडून कुरिअरने बंदुकीच्या गोळ्या आणि जीवे मारण्याची धमकी असलेली चिठ्ठी आल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी विकास रेपाळे यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा-टेंभीनाका देवीच्या मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी, कोंडीत शाळेच्या बस अडकल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास रेपाळे हे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ते वागळे इस्टेट भागात वास्तव्यास आहेत. त्यांच्या राहत्या घरी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कुरिअरने तीन भेटवस्तू आल्या होत्या. या भेटवस्तू त्यांच्या आईने स्विकारल्या आणि दुसऱ्या दिवशी विकास यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबत पाठविल्या. यातील एक भेटवस्तूचे पाकीट विकास रेपाळे यांनी उघडून बघितले असता, त्यात शार्पनरचा एक बॉक्स होता. त्यात, कागदात चिकटपट्टीने चिटकवलेल्या बंदुकीची गोळी आढळली. त्यासह, एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत ‘इस बार हात मे दे रहा हु, अगली बार खोपडी मे डाल दुगा’ अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी विकास रेपाळे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.