ठाणे : ठाण्याहून पालीच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसगाडीमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या बसगाडीमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. आग लागल्याचे वृत्त कळताच, सर्व प्रवासी बसगाडीतून बाहेर पडले. त्यामुळे दुर्घटना टळली.
ठाण्यातील खोपट एसटी स्थानकातून सकाळी ८ वाजताच्या सुमारास पालीच्या दिशेने बसगाडी निघाली होती.

या बसगाडीतून ४० ते ४५ जण प्रवास करत होते. बसगाडी कळवा येथील विटावा भागात आली असता, बसगाडीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यानंतर आग लागली.

हेही वाचा…घरावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ तरुणांवर येणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवासी तात्काळ आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती पोलिसांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.