कल्याण : सातार येथे गेले अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या सातारा हिल मॅरेथाॅन या अवघड स्पर्धेत कल्याण डोंबिवली पालिकेतील अभियंता असलेल्या दोन सायकल पटुंनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. देशाच्या विविध भागातून या स्पर्धेत सुमारे सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

कल्याण डोंबिवली पालिकेतील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, जलनिस्सारण विभागाचे साहाय्यक अभियंता अजीत देसाई यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. मागील आठवड्यात ही स्पर्धा पार पडली. २१ किलोमीटर लांबीच्या या स्पर्धेत स्पर्धकांना मोठी कसरत करावी लागते. या स्पर्धेचा मार्ग हा सातारा शहरातून कास पठाराकडे जाणाऱ्या साडेदहा किलोमीटर अवघड वळण आणि चढणाचा असून त्यानंतर उर्वरित मार्ग हा साडेदहा किलोमीटर उताराचा आहे. यामध्ये स्पर्धकांना आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून त्यात सहभाग घ्यावा लागतो.

हेही वाचा : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाअंतर्गत ठाणे शहरात दोन दिवसांत सात हजार महिलांची आरोग्य तपासणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्पर्धेत कडोंमपातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि जलनि:स्सरण आणि मलनिःसारण विभागाचे सहाय्यक अभियंता अजित देसाई सहभागी झाले होते. प्रशांत भागवत यांनी तीन तास 27 मिनिटे आणि १३ सेकांदामध्ये तर देसाई यांनी २ तास १८ मिनिटे आणि ४७ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. कल्याण सायकल क्लब, रायडर्स क्लब यांसह पालिका अधिकाऱ्यांनी या दोन्ही स्पर्धकांचे कौतुक केले आहे. हे दोघे उत्तम सायकल पटु आहेत.