दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आलेल्या जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या काॅम्रेड्स मॅरेथाॅन स्पर्धेत कल्याण मधील तीन धावपटुंनी स्पर्धा वेळेच्या आत धावण्याचे महत्वपूर्ण टप्पे पूर्ण करून यश मिळविले आहे. हे तीन धावपटू कल्याण रनर्स क्लबचे सदस्य आहेत. या यशाबद्दल कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते त्यांचा पालिका मुख्यालयात सत्कार करण्यात आला.

हेही वाचा >>> ठाणे स्थानकात भाजपा – शिवसेना आमनेसामने ; कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य
Virat Kohli
सातत्यपूर्ण कामगिरीचा बंगळूरु, कोलकाताचा प्रयत्न; ‘आयपीएल’मध्ये आज आमनेसामने

दिलीप घाडगे, डाॅ. मिलिंद ढाले, बिंदेश सिंग अशी यशस्वी धावपटुंची नावे आहेत. कल्याण रनर्स क्लबचे ते सदस्य आहेत. मुंबई, ठाणेसह विविध मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये ते नेहमी सहभागी होत असतात. या सत्कार कार्यक्रमाला मुख्य व वित्त लेखा अधिकारी सत्यवान उबाळे, शहर अभियंता सपना कोळी, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत उपस्थित होते.

हेही वाचा >>> कणकवलीतील रहिवाशाची हत्या करणाऱ्या डोंबिवलीतील सराईत गुन्हेगाराला जन्मठेप

काॅम्रेड्स स्पर्धा ही ९० किमी लांबीची स्पर्धा आहे. या स्पर्धेत या वर्षी शंभरहून अधिक देशातील १५ हजार धावपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी होणे हा एक वेगळा आनंद असतो. कल्याणचे दिलीप घाडगे यांनी ही स्पर्धा ११ तास ३० मिनीटे, डाॅ. मिलिंद ढाले यांनी ११ तास ४६ मिनीटे, सिंग यांनी ११ तास ३६ तास मिनीटामध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. गेले अनेक वर्ष हे धावपटू या स्पर्धेतील सहभाग आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते. ते या निमित्ताने आम्ही पूर्ण केले, अशा प्रतिक्रिया या स्पर्धकांनी दिल्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे.