Rajan vichare : काही खासदारांना संसद रत्न पुरस्कार नुकतेच देण्यात आले. यामध्ये शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांचाही सामावेश आहे. नुकताच त्यांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आला. परंतु म्हस्के यांना मिळालेल्या या संसद रत्न पुरस्कारा वरुन ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर ‘बच्चा नया है’ असे म्हणत टीका केली.
काही दिवसांपूर्वीच खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पुरस्कार मिळताच, शहरात अनेक ठिकाणी फलक झळकले होते. राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी सोमवारी सायंकाळी कोपरी येथील जुना रेल्वे पूलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली.
राजन विचारे हे माध्यमांसी संवाद साधताना म्हणाले की, २०१८ ला कामाला मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी कामाला सुरुवात झाली. रेल्वे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला चालना मिळाली. सप्टेंबरमध्ये उड्डाणपूलाचे पूर्ण काम होऊन लोकार्पण होणार आहे असे त्यांनी सांगितले.
सध्या आपल्या नेत्यांना प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी वेळ नाही. ज्यासाठी निवडून दिले. त्याऐवजी दुनियादारी करत आहे. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाठपुराव्या शिवाय कोणतेही काम होत नाही. पाठपुरावा करताना प्रक्रिया असते. ठाणे रेल्वे स्थानकाच्या नुतणीकरणाला मंजुरी मिळाली आहे. परंतु पाठपुरावा नसल्याने हा प्रकल्प सुरु झालेला नाही. पाठपुरावा करणे आवश्यक असताना आपले नेते दिल्लीत जाऊन फोटो काढत बसले आहेत. रेल्वे आणि महापालिकेकडून मंजूरी घेणे आवश्यक असते असे त्यांनी सांगितले.
त्यांना संसदरत्न नाही, तर वाचाळवीर पुरस्कार मिळाला पाहिजे होता
– खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर राजन विचारे यांनी टीका केली, त्यांना संसद रत्न पुरस्कारा ऐवजी वाचाळवीर पुरस्कार द्यायला हवा होता. कारण संसदेत ते कमी असतात. पण इतर ठिकाणी बोलायला पुढे असतात. कारण नवीन आहेत ते.. बच्चा नया है… असे म्हणत राजन विचारे यानी म्हस्के यांच्यावर टीका केली.