ठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर पोलीस ठाणे, परमार्थ निकेतन रुग्णालय परिसरातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी बदल लागू केले आहे. मंगळवारपासून ३० दिवस प्रायोगिक तत्त्वावर हे वाहतुक बदल लागू असतील.
वागळे इस्टेट येथील टाटा फायजन भागातून परमार्थ निकेतन रुग्णालय मार्गे मिनार बंगला, माविस औषधालय, मंगल कार्यालय, श्रीनगर पोलीस ठाणे, गार्डन रेस्टाॅरंट, मनोज शिंदे यांचे कार्यालय मार्ग येथून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गावर कोंडी होत असते. या वाहतुक कोंडीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देखील कोंडीचा फटका बसतो. वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी बदल लागू केले आहेत.
श्रीनगर पोलीस ठाणे परिसर आणि मुंबई येथून मनोज शिंदे कार्यालय, गार्डन रेस्टाॅरंट, मंग कार्यालय, माविस औषधालय येथून मिनार बंगलाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना श्रीनगर चौक येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने श्रीनगर चौक येथून बँक ऑफ महाराष्ट्र, रुपल लक्ष्मी इमारत परिसरातून शारदा लाँड्री, मिनार बंगला येथून डावे वळण घेऊन वाहतुक करतील. येथील वाहतूक बदल ३० दिवस प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आले आहे. काही हरकत किंवा सूचना असल्यास लेखी स्वरुपात तीन हात नाका येथील ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त कार्यालय येथे पाठविण्याचे आवाहन केले आहे. हकरती प्राप्त झाल्या नाही तर हे वाहतुक बदल पुढील आदेश होई पर्यंत कायम स्वरुपात अमलात राहील असे पोलिसांनी स्पष्ट केले.