डोंबिवली- डोंबिवली येथील पश्चिमेतील विजयनगर सोसायटी मधील विजयनगर सभागृहा जवळील सहा महिन्यापूर्वी बांधण्यात आलेला काँक्रीटचा रस्त्या खचला आहे. या भागातून वाहनांची सतत वर्दळ असल्याने या खचलेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरांतर्गत भागात काँक्रीट रस्त्यांची जी कामे किती निकृष्ट पध्दतीने ठेकेदारांकडून केली जात आहेत याचा हा नुमना असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या. ही कामे करताना काँक्रीट रस्त्यावर वेळेवर पाणी मारले जात नव्हते. कामाचा उरक होण्यासाठी घाईघाईने ही कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यांवरील काँक्रीट वाहन गेले की उडू लागते, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिव्यातील दौऱ्यावरून भाजप आक्रमक

रस्ता खचलेल्या भागातून अवजड वाहन गेले तरी वाहनाचा टायर बाजुच्या गटारात, खचलेल्या रस्त्यात अडकण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. काँक्रीट कामे सुरू असताना त्याच्यावर योग्य पर्यवेक्षण पालिका, ठेकेदाराच्या अभियंत्यांकडून होत नाही. रस्त्यांची कामे काही ठिकाणी निकृष्ट पध्दतीने केली जात आहेत, अशा तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> पदपथ अडवणाऱ्या कार विक्रेत्यावर कारवाई दहा फुटांचा पदपथ मोकळा, वाहनचालकांना दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दीड वर्षाच्या काळात पालिकेतील बहुतांशी अभियंत्यांची पदोन्नत्ती झाली आहे. प्रभागात काम करण्यासाठी कनिष्ठ अभियंता नाहीत. एक उपअभियंता उपलब्ध आहे. त्याच्याकडे तीन ते चार पदभार आहेत. कनिष्ठ अभियंता नसल्याने रस्ते, मलनिस्सारण, जलनिस्सारण कामांवर पर्यवेक्षण करण्यासाठी अभियंते नसल्याची माहिती पालिकेतून समजते. बहुतांशी अभियंते रस्ते, बांधकाम, मल, जल निस्सारण विभागात काम करण्याऐवजी मलईदार नगररचना विभागाकडे आच लावून बसले आहेत. प्रशासनावर आता कोणाचा वचक राहिला नसल्याने कर्मचारी मनमानीने कामे करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्याची यामध्ये होरपळ होत आहे. सरळमार्गाने काम करणारे अधिकारी प्रशासनातील मनमानी पाहून हैराण आहेत. या सगळ्या अनागोंदीची एका जागरुक नागरिकाकडून लवकरच मंत्रालयात तक्रार केली जाणार आहे.