ठाणे – घोडबंदर येथील माजिवडा परिसरात वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जात असलेल्या उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास उंची अडथळा (हाईट बॅरियर) तुटून लटकत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी उंची अडथळा बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.

ठाणे शहरातून मुंबई – नाशिक तसेच घोडबंदर असे दोन महामार्ग जातात. हे दोन्ही महामार्ग माजिवडा भागात एकमेेकांना जोडण्यात आलेले आहेत. यातील मुंबई – नाशिक महामार्गांना जोडणाऱ्या माजिवडा उड्डाणपूला जवळ उंची अडथळा (हाईट बॅरियर) बसविण्यात आला आहे. हे उंची अडथळा अवजड वाहने पुलावरून जाण्यापासून रोखण्यासाठी लावण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास माजिवडा उड्डाणपूलाजवळील उंची अडथळा(हाईट बॅरियर) तुटून लटकत असल्याची निदर्शनास आले. यामुळे नाशिक-मुंबई या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तुटून लटकत असलेला उंची अडथळा(हाईट बॅरियर) आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सुस्थितीत करण्यात आला. तसेच नाशिक-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.