देशातील एका नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या एक लाख सदस्यांची खासगी माहिती हॅकरने चोरून ती १९ हजार ९९९ रुपयांना विक्रीस काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संस्थेत देशभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती सदस्य आहेत. या घटनेनंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

देशातील या नामांकित स्वयंसेवी संस्थेत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्ती सदस्य आहेत. या संदस्यांची माहिती आणि इतर तपशील संकलित करण्याचे काम ठाण्यातील एक सॉफ्टवेअर कंपनीकडून केले जाते. एका हॅकरने या स्वयंसेवी संस्थेच्या एक लाख सदस्यांची माहिती हॅक करून ती १९ हजार ९९९ रुपयांना रुपयांना विक्रीसाठी काढली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॅकरने सदस्याचा मोबाईल क्रमांक, नाव, इमेल आयडी, त्यांचे व्यवसाय, जन्मतारिख, विवाहाची तारिख यासह काही महत्त्वाच्या तपशील चोरला आहे. या घटनेची माहिती संस्थेच्या सदस्यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधला. या माहितीच्या चोरी प्रकरणी तसेच त्याचा गैरवापर होणार असल्याने स्वॉफ्टवेअर कंपनीच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.