भिवंडी येथे शनिवारी दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पोलिस, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी इमारत दुर्घटनेची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून घटनेची आणि बचवकार्याची माहिती घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी इमारत दुर्घटना स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना धीर दिला. यावेळी या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या प्रेम आणि प्रिन्स या लहानग्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. मुख्यमंत्र्यांची चौकशी करताच लहानग्या प्रिन्सला रडू कोसळले. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी वडीलकीच्या नात्याने त्याला धीर देत त्यांचे अश्रू पुसले तसेच काळजी करू नकोस असे सांगत त्याला धीर दिला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.