अंबरनाथ येथील जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम काम हाती घेण्यात आहे आहे. यामुळे जिल्ह्यातील ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरांतील औद्योगिक क्षेत्राचा आणि काही रहिवासी भागांचा पाणीपुरवठा उद्या, शुक्रवारी बंद राहणार आहे.

हेही वाचा >>>चित्रपटातील थराराप्रमाणे पाठलाग करुन डोंबिवलीत पादचाऱ्यांनी मोबाईल चोरांना पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश एमआयडीसीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा करणाऱ्या अंबरनाथ येथील जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आहे. हे काम शुक्रवारी सकाळी ७.३० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि औद्योगिक क्षेत्राचाही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या पाणी बंदचा सर्वाधिक परिणाम हा ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासुन मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत तसेच कळवा प्रभाग समिती मधील काही भाग व कोलशेत मधील काही परिसरात होणारा आहे. तर जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मात्र हा पाणी पुरवठा पूर्ववत होई पर्यंत येते एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.