डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्याला मारण्याची धमकी | Threat to kill BJP worker in nehru road railway foot bridge ramnagar police station Dombivli | Loksatta

डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्याला मारण्याची धमकी

डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते कृष्णा परुळेकर यांना गुरुवारी दुपारी एका इसमाने धक्काबुक्की करुन मारहाण केली.

डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्याला मारण्याची धमकी
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

डोंबिवली : डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते कृष्णा परुळेकर यांना गुरुवारी दुपारी एका इसमाने धक्काबुक्की करुन मारहाण केली. नेहरु रस्त्यावरील रेल्वे पादचारी पुलाजवळ हा प्रकार घडला. परुळेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मारेकऱ्याची ओळख पटल्यावर परुळेकर यांनी पूर्ववैमनस्यातून हा हल्ला आपणावर करण्यात आला आहे, अशी तक्रार पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली. भाजपचे कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब, महिला प्रमुख रेखा चौधरी, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा पदाधिकारी नंदू जोशी यावेळी उपस्थित होते.

परुळेकर हे यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी कोपर भागात शिवसेना नगरसेवकाच्या विरुध्द उभे राहिले होते. तेव्हापासून या भागात परुळेकर यांना लक्ष्य केले जात असल्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कृष्णा परुळेकर हे बुधवारी दुपारी नेहरु रस्त्याने येऊन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाने घरी पायी चालले होते. रेल्वे पादाचारी पुलावरुन उतरत असताना आरोपी पूजन शुक्ला याने कृष्णा यांना अडवून त्यांना धक्का देऊन त्यांना मारहाण केली. आणि मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : डोंबिवलीतील पाथर्ली येथे तीन वर्षाच्या मुलाला सावत्र आईने ठार मारले

कृष्णा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली आहे. उपनिरीक्षक सुनील पाटील तपास करत आहेत. पूजन हा राजकीय वजनदार नगरसेवकाचा कार्यकर्ता आहे. यापूर्वी कृष्णा यांनी कल्याण डोंबिवली पालिका निवडणूक कोपर प्रभागातून लढविली होती. तेव्हापासून ते काही राजकीय मंडळींच्या नजरेत आहेत असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पालिकेचे नियम कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी पण, त्रास मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना

संबंधित बातम्या

ठाणे : भिवंडीत गोळीबारात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात
कसारा-इगतपूरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली ; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पितृपक्षात शुभकार्य टाळण्याची गरज नाही, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण
वसईतील ख्रिस्तायण : वसईतील पारंपरिक व्यवसाय
आयसिसमध्ये सहभागी झालेला ठाण्याचा फहाद शेख ठार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजपची १५ वर्षांची राजवट संपुष्टात, काँग्रेस आणखी क्षीण
नोटाबंदीसंबंधी कागदपत्रे सादर करा!; केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
रायगडमध्ये युती-आघाडी जुळवताना कसरत; ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये प्रथमच जाहीर फाशी
कर्जे महाग!; रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ