ठाणे : आदिवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नये या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी नागरिक मोठ्यासंख्येने कोर्टनाका, राबोडी परिसरात जमणार असून यामुळे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी येथील मार्गात वाहतुक बदल लागू केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साकेत मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. या मोर्चामुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतुक पोलिसांनी येथील मार्गात बदल लागू केले आहेत. यानुसार कोर्टनाका येथून सेंट्रल मैदान, आरटीओ मार्गे ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडे वाहतुक करणाऱ्या मार्गावरील वाहनांना पॅव्हेलियन उपाहारगृह येथे प्रवेशबंदी लागू केली आहे. येथील वाहने कोर्टनाका येथून पोलीस शाळा मार्गे किंवा जीपीओ चौक येथून उजवीकडे वळण घेऊन वाहतुक करता येईल. हे वाहतुक बदल सकाळी ९ ते मोर्चा संपेपर्यंत लागू राहतील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes due to tribal march tomorrow in thane amy
First published on: 26-10-2023 at 19:11 IST