ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाण्यातील घोडबंदर भागात सुरू असलेल्या वाहतुक कोंडीमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांनी प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरूवात केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. सोमवारी ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कोलशेत- ढोकाळी भागातील रस्त्यांची पाहाणी केली. तर दुसरीकडे अपघाताचे केंद्र ठरलेल्या पातलीपाडा येथील उड्डाणपुलालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने अडथळे बसवून तात्पुरती उपाययोजना करण्यास सुरूवात झाली आहे. लवकरच येथील उड्डाणपुलाच्या चढणी जवळील भागात कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. परंतु या उपाययोजना कायमस्वरूपी अमलात आणाव्यात असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ठाणे शहरातील कोंडीचे केंद्र ठरलेल्या घोडबंदर मार्गावर मागील काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीमध्ये शाळेच्या बसगाड्या, नोकरदारांची वाहने अडकत आहेत. मागील आठवड्यात सलग दोन दिवस वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या अपघाताने अनेक शाळांनी दुपारच्या सत्रामध्ये सुट्टी जाहीर केली. तर, सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी परतणारे विद्यार्थी अडीच ते तीन तास कोंडीत अडकून होते. नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.

6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
accused absconded from Ajani police station
नागपूर : आजनी पोलीस ठाण्यातून आरोपी पसार
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

हे ही वाचा…ठाणेकरांना ७२ तासआधी हवा गुणवत्ता कळणार? हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित

या कोंडीनंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. टीकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिका, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना करण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी उपायुक्त पंकज शिरसाट, ठाणे महापालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे आणि माजी नगरसेवक संजय भोईर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कोलशेत – ढोकाळी मार्गाची पाहाणी केली.

या मार्गावर मागील काही वर्षांत वाहतुकीचा भार वाढला आहे. कोलशेत येथे तयार करण्यात आलेले महापालिकेचे सेंट्रल पार्क यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी काही ठिकाणी दुभाजक, गतीरोधक आहेत. त्यांचे स्थान बदलण्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच येथील वाहतुकीचे आणखी काही दिवस सर्व्हेक्षण केले जाणार आहे. तसेच पातलीपाडा येथील उड्डाणपुलाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात अडथळे बसविले आहेत. उड्डाणपुलाच्या चढणीजवळ काही दुरूस्ती करून लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. तसेच कॅडबरी उड्डाणपुलाजवळही अपघात रोखण्यासठी नव्याने अडथळे बसविण्यात आले आहेत. उपाययोजना करण्यास सुरूवात झाली असली तरी त्या कायमस्वरूपी अमलात आणल्या जाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

हे ही वाचा… अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहे. कोलशेत-ढोकाळी रस्त्याचे सर्व्हेक्षण महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सुरू आहे. सर्व्हेक्षणानंतर काही बदल सुचविले जातील. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.