ठाणे : ठाणे येथील तुळशिधाम भागात मंगळवारी सकाळी डी.ए.व्ही. स्कूल जवळ गुलमोहराचे झाड उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पडले आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नसून झाड कापून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

ठाणे शहरात सोमवार सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला असून मंगळवारीही शहरात पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडत आहेत. अशाचप्रकारे तुळशिधाम भागात मंगळवारी सकाळी डी.ए.व्ही. स्कूल जवळ गुलमोहराचे झाड उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पडले. यामुळे महावितरणचे दोन खांब पूर्णपणे वाकले आहेत. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित पोहचले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून पडलेले झाड कापून बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास