डोंबिवलीत महात्मा फुले रस्त्यावरील एका सोसायटीच्या बंद घरातील नऊ लाखाचा ऐवज लुटून नेणाऱ्या दोन चोरट्यांना विष्णुनगर पोलिसांनी कल्याण पूर्वेतील नेवाळी भागातून अटक केली. हे दोघेही मजूर कामगार आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांनी चोरी करणे सुरू केले होते.

हेही वाचा >>> वादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या

विष्णु सुभाष भांडेकर (२४, मजूर, रा. गावदेवी चाळ, मलंगरोड, नेवाळी नाका, साईनाथनगर, कल्याण पूर्व), शंकर बाबु पवार (३०, चहा विक्रेता) अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक एम. के. खंदार यांच्या नेतृत्वा खालील पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधील नोंदी वरुन आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपींनी वापरलेली दुचाकी आणि त्याचा क्रमांक स्पष्ट दिसत होता. या नियंत्रण कक्षाच्या हवालदार मनीषा मोरे यांनी आरटीओकडून या वाहन क्रमांकाची खात्री केली. हे वाहन नेवाळी नाका भागात वापरले जात असल्याची माहिती मिळाल्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कुलदीप मोरे, हवालदार मनीषा मोरे, कुंदन भामरे, राजेंद्र पाटणकर, शकील जमादार, तुळशीराम लोखंडे, शकील तडवी, शशिकांत रायसिंग यांनी नेवाळी भागात दोन दिवस सापळा लावला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारी दुचाकी या भागात दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी महात्मा फुले रस्त्यावर एका घरात चोरी केल्याची कबुली दिली.

हेही वाचा >>> कल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश शिंपी या अरुणोदय सोसायटीत सिध्दी इमारतीत राहणाऱ्या निवृत्त रहिवाशाच्या बंदिस्त घरातून चोरट्यांनी नऊ लाखाचा ऐवज चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.