कल्याण : कल्याण पूर्वेतील पत्रीपूल भागातील नवी गोविंदवाडी भागात शुक्रवारी दोन तरूणांनी याच भागातील एका तरूणीची छेड काढली. तरुणीच्या कुटुंबीयांनी तरूणांच्या घरी जाऊन याप्रकरणी जाब विचारला. यावरून रस्त्यावरच तरूणीचे नातेवाईक आणि आरोपी तरूणांचे कुटुंब यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

या हाणामारीवरून नवी गोविंदवाडी भागात वातावरण तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने टिळकनगर पोलिसांनी या भागात बंदोबस्त तैनात केला. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी दोन्ही गटाविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटातील एकूण पाच जणांना अटक केली आहे. जाकीर शेख, अरहम सय्यद अशी छेड काढणाऱ्या तरूणांची नावे आहेत. ते नवी गोविंदवाडी भागात राहतात. पोलिसांनी सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आरोपी पीडित तरूणीचा घराबाहेर आली की पाठलाग करायचे. तिचा मोबाईल क्रमांक देण्याची मागणी करत होते. तरूणी या तरूणांना प्रतिसाद देत नव्हती. ही तरूणी घराबाहेर पडली की आरोपी तरुण तिला त्रास द्यायचे.

हे ही वाचा…ठाणे : जादा परताव्याच्या अमीषाने कोट्यवधीची फसवणूक

या सततच्या त्रासाला कंटाळुन तरूणीने घडत असलेला प्रकार शुक्रवारी घरी आई, वडिलांना सांगितला. पीडित तरूणीचे आई, वडील आणि इतर कुटुंबीय याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी अरहम सय्यद याच्या घरी गेले. त्यावेळी अरहमच्या कुटुंबीयांनी तो असे काही करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. तरुणीच्या कुटुंबीयाना तेथून जाण्यास सांगितले. यावरून जोरदार बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही कुटुंबीयांमध्ये सदस्य एकमेकांना भिडून भर रस्त्यात जोरदार राडा झाला.

हे ही वाचा…दिवा, भांडर्लीची जमीन होणार कचरामुक्त ? कचराभुमीवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती टिळकनगर पोलिसांना समजताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या आदेशावरून पोलिसांचे एक पथक नवी गोविंदवाडी भागात गेले. तेथे त्यांनी दोन्ही बाजूकडील एकूण पाच सदस्यांना अटक केली. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.