कल्याण : कल्याण जवळील द्वारली गाव हद्दीतील जमिनीचा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक बसले होते. त्याचवेळी अचानकपणे गणपत गायकवाड यांनी जवळील रिव्हाॅल्व्हरमधून महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. या घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

आमदार गायकवाड यांनी निशाणा साधून गोळीबार केल्याची पोलिसांनी दिली असून या माहितीला सीसीटीव्ही चित्रणामुळे दुजोरा मिळाला आहे. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शिवसेनेचे महेश पाटील, राहुल पाटील बसले होते. त्यांच्या समोरील बाजूस पोलीस अधिकाऱ्याच्या बाजुला आमदार गायकवाड हे बसले होते. त्याचवेळी दालनाच्या नागरिकांचा बाहेर ओरडा सुरू होता. तो शांत करण्याचे आवाहन पोलीस अधिकारी करत होते.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

हेही वाचा : गोळीबारीच्या घटनेमागे कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीचे राजकारण; भाजपच्या कल्याण पूर्वेवर शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा

दालनामध्ये आमदार गायकवाड यांच्या समोर बसलेले महेश गायकवाड हे मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. त्यांच्या बाजुला त्यांचे समर्थक राहुल पाटील आणि अन्य एक असे बसले होते. बराच वेळ दालनात शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हते. अचानक आमदार गायकवाड यांनी स्वसंरक्षणासाठी असलेल्या रिव्हाॅल्व्हरमधून महेश आणि त्यांच्या समर्थकांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा मोठा आवाज होताच दालनात बसलेले तीन जण दालनाच्या बाहेर पळू लागले. नेम धरून गणपत यांनी गोळीबार केल्याने गोळी लागून महेश, त्यांचा समर्थक राहुल दालनात खाली पडले. यावेळी गणपत यांनी गोळी लागून खाली पडलेल्या महेश यांच्या एक समर्थकाला रिव्हाॅल्व्हरच्या दस्ताने मारण्यास सुरूवात केली. खाली पडलेल्या जखमीच्या हाताला घट्ट पकडून त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू असताना बाहेरून गोळीबाराच्या आवाजाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गणपत आणि महेश यांच्या समर्थकांनी दालनात धाव घेतली. त्यावेळी दोन जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी दालनात महेश आणि गणपत यांच्या समर्थकांनी एकमेकांंवर खुर्च्या उचलून एकमेकांना मारण्याचा जोरदार प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसत आहे.

हेही वाचा : “घटना दुर्दैवी…महेश गायकवाडांनी लवकर बरे व्हावे”, मुख्यमंत्र्यांची गोळीबार प्रकरणानंतर पहिली प्रतिक्रिया

बिहारच्या पुढे वाटचाल

यापूर्वी उत्तरप्रदेश, बिहारमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात, दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत होत्या.

आता त्या राज्यांमधील प्रकार मागे पडून संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात पोलीस ठाण्यात भाजपच्या सत्ताधारी आमदाराने गोळीबाराचा प्रकार केल्याने राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्याने कायद्याचे पालन करायचे तोच रिव्हाॅल्व्हरने गोळीबार करत असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.