scorecardresearch

राणेंनी कोकणातील हत्याकांडांच्या चौकशीचाही आग्रह धरावा!; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

सुशांत सिंग राजपुत यांच्या आत्महत्येचा जुना विषय पुन्हा पुन्हा काढून शिळय़ा कढीला ऊत आणला जात असल्याचेही ते म्हणाले. 

(संग्रहित छायाचित्र)

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणात आजवर झालेल्या सर्वच हत्याकांडांची सीबीआयमार्फत चौकशीचा आग्रह धरावा, अशी प्रतिक्रिया नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. सुशांत सिंग राजपुत यांच्या आत्महत्येचा जुना विषय पुन्हा पुन्हा काढून शिळय़ा कढीला ऊत आणला जात असल्याचेही ते म्हणाले. 

ठाणे महानगरपालिका  आणि ठाणे स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सॅटिस प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या डेकचे (मल्टीमोडल ट्रान्झीट हब) भूमिपूजन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी झाले. या कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रमेश मोरे यांच्या हत्येप्रकरणी केलेल्या भाष्याबाबत मंत्री शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. शिवसैनिक रमेश मोरे यांच्या हत्येबाबत बोलणाऱ्या राणे यांनी कोकणातील आतापर्यंतच्या सर्वच हत्याकांडांबाबतही बोलावे. यापैकी अनेक प्रकरणांत काहीच निष्पन्न झाले नाही आणि सूत्रधारासह आरोपीही सापडलेले नाहीत. राणे हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणांचा तपास सीबीआयला करण्यास सांगावे.

ठाणे पूर्वेतील सॅटिस डेकचे भूमिपूजन

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात २.४० कि.मी. लांबीच्या मार्गिकेचे बांधकाम तसेच ८००० चौरस मीटर क्षेत्राच्या उन्नत बस डेकचे (मल्टीमोडल ट्रान्झीट हब) बांधकाम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी तळमजल्यामध्ये वाहनतळ सुविधा असणार असून त्याठिकाणी दोनशे चारचाकी वाहने आणि १२५ दुचाकी वाहनांच्या पार्किंग क्षमतेची सुविधा असणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister narayan rane cbi enquiry urban development minister eknath shikshan akp

ताज्या बातम्या