ठाणे : निवडणुक आयोगाने यापूर्वी खरी शिवसेना आम्ही आहोत, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची वाट बघत आहोत, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांना विविध प्रकारचे कागदपत्र तपासावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत आहे.

मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्ष हे आता लवकरच वेळापत्रक देतील, असा विश्वासही  खासदार शिंदे यांनी व्यक्त केला. यापूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे विचार देत होते. याच विचारांचे सोने लुटण्यासाठी सर्वजण एकत्र येत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यातून कॉंग्रेसला गाढण्याचे विचार दिले होते. परंतु आता हिंदुत्वाचे विचार बाजूला पडले असून, केवळ कॉंग्रेस कशी वाढेल यासाठीच प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उध्दव ठाकरे हे मालमत्तेचे वारसदार आहेत.

हेही वाचा >>> भाजपाला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा करण्यामागची कारणे उघड करा, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेंचे जितेंद्र आव्हाडांना आव्हान

परंतु हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असेही ते म्हणाले. मागील दिड वर्षापासून राज्य सरकाराने सर्वच निर्बंध दूर केले आहेत. त्यामुळेच सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही लोकांवर बोलायला मला आवडत नाही, असे सांगत त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर बोलणे टाळले. तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मात्र संजय राऊत यांच्यावर टिका करत ते भंगार मनोवृत्तीचे असल्याचा पुर्नउच्चार केला.

हेही वाचा >>> Navratri Ustav 2023: टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांनी पक्षाला भंगारात नेण्याचे काम केले आहे. त्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस आणि राष्ट्रीवादीच्या गोदामात भंगार बनून ठेवले आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. ज्या ड्रग्ज माफीयाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे, त्याच्या सोबत उध्दव ठाकरे यांचे फोटो आहेत, त्याला पक्षात घ्यावे म्हणून कोणी दबाव आणला होता. केवळ सहानभुती मिळविण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.