पश्चिम बंगाल मधील आसनसोल दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून किमती ऐवज लुटून नेला होता. या दरोडेखोरांमधील एक दरोडेखोर आसनसोल एक्सप्रेसने भिवंडी-कल्याण येथे येण्यासाठी प्रवास करत असल्याची माहिती आसनसोल पोलिसांनी कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिली. जवानांनी आसनसोल एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात येताच सापळा लावून पश्चिम बंगाल मधून पळून आलेल्या दरोडेखोराला मंगळवारी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>जळगाव, पालघर, ठाणे शहरांमध्ये वाहने चोरणारा सराईत चोरटा अटक

इमरान तेजाउद्दीन अन्सारी (३२, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आसनसोल दुर्गापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमित हल्डर यांनी मंगळवारी सकाळी रेल्वेने कल्याण रेल्वे स्थानकात येऊन रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना स्वताची ओळख दिली. त्यांनी मागील सोमवारी आसनसोल पोलीस ठाणे हद्दीत इमरान अन्सारी आणि त्याच्या दोन साथीदारांनी सुनील कुमार अग्रवाल यांच्या घरावर रात्रीच्या वेळेत दरोडा टाकून किमती ऐवज चोरुन नेला. अग्रवाल यांनी प्रतिकार करताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांना गंभीर जखमी केले. या दरोडेखोरांमधील इमरान हा आसनसोल एक्सप्रेसने भिवंडी-कल्याण येथे येण्यासाठी आसनसोल एक्सप्रेसने निघाला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक हल्डर यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सुरक्षा बळाच्या जवानांना दिली. आसनसोल रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये इमरान अन्सारी कल्याणला आसनसोल एक्सप्रेसने येत असल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा >>>ठाणे: जखमी श्वानावर उपचार सुरू असतानाच तिच्या पिलाचा अपघाती मृत्यू; ठाण्यातील पाचपाखाडी येथील घटना

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने इमरानला पकडणे खूप महत्वाचे होते. कल्याणचे रेल्वे सुरक्षा बळाचे साहाय्यक उपनिरीक्षक रतन सिंह यांनी तातडीने आपल्या सहकारी जवानांचे एक पथक तयार केले. उपनिरीक्षक हल्डर यांच्या बरोबर आसनसोल एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात ज्या फलाटावर येते, तिथे पथक मंगळवारी तैनात केले. मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजता आसनसोल एक्सप्रेस कल्याण स्थानकात येताच, इमरान ज्या डब्यात बसला होता. त्या डब्याच्या चारही बाजुने पोलिसांनी कडे केले होते. उपनिरीक्षक हल्डर यांनी इमरानला डब्यातून उतरताना पाहताच त्यांच्या इशाऱ्यावरुन सापळा पथकाने त्याला तात्काळ पकडले. पोलिसांच्या जाळ्यात अडकलोत हे समजताच इमरानने झटका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला. इमरानला विशेष पथकाच्या साहाय्याने पुन्हा आसनसोल येथे तपासकामासाठी नेण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal robber arrested at kalyan railway station amy
First published on: 23-11-2022 at 12:31 IST