मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा चर्चा झाली असतानाच, त्यासंदर्भात ठाणे शहरात मोठे बॅनर लागले आहेत. या बॅनरद्वारे धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात, अशी विचारणा करत लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचा २० वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या नेमका कसा झाला, याविषयी वेगवेगळ्या चर्चा आजही होत आहेत. ठाण्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराने काही प्रतिथयश वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती सध्या लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या आहेत. त्यात आनंद दिघे यांचे नेमके काय झाले याचा गौप्यस्फोट केला जाणार असे म्हटले आहे. तसेच आनंद दिघे यांच्याविषयी झालेल्या राजकारणाचे आपण साक्षीदार असल्याने योग्य वेळी वस्तुस्थिती उघड करणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या निमित्ताने दिघे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा चर्चा झाली असतानाच, त्यासंदर्भात ठाणे शहरातील मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी शहरात मोठे बॅनर लावले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात २६ ऑगस्ट २००१ नक्की आमच्या धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात अशी विचारणा त्यांनी केली आहे.तसेच लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे, अशी माग्नीबी त्यांनी केली आहे.