ठाणे :  कळवा येथील मुकूंद केणी क्रीडा संकुलात ‘सुदृढ महिला..सदृढ कुटुंब’  या संकल्पनेतून ‘वुमेन्स झोन’ सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी महिलांसाठी झुम्बा, अ‍ॅक्युप्रेशर वॉक, योगा आणि खुली व्यायामशाळा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यानिमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीने कळव्यातील महिलांना अनोखी भेट दिली आहे.

हेही वाचा >>> माणकोली पुलाच्या उद्घाटनानंतर डोंबिवली कोंडीच्या विळख्यात?

Now women are also in the crime investigation team in the police stations of the Commissionerate
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार केणी यांच्या संकल्पनेतून मुकूंद केणी क्रीडा संकुलात ‘वुमेन्स झोन’ सुरु करण्यात आला आहे.  ‘सुदृढ महिला..सदृढ कुटुंब’  या संकल्पनेतून क्रीडा संकुलामध्ये फक्त महिलांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ स्व. मुकूंद केणी क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. विविध क्रीडा प्रकारांनी सज्ज असलेल्या या क्रीडा संकुलात महिलांसाठी स्वतंत्र विभाग असावा, अशी संकल्पना मंदार केणी यांनी मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेतून ‘सुदृढ महिला..सदृढ कुटुंब’ हा विचार समोर ठेवून झुम्बा, अ‍ॅक्युप्रेशर वॉक, योगा आणि खुली व्यायामशाळा या प्रकारांनी सज्ज असलेला स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मेट्रोची धाव आता उल्हासनगरपर्यंत; ‘मेट्रो ५’चा विस्तार करण्यासाठी लवकरच सल्लागारांची निवड

महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे-पालघर महिलाध्यक्षा ॠता आव्हाड आणि ठाणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांच्या हस्ते या स्वतंत्र दालनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, माजी नगरसेविका अपर्णा साळवी,मनिषा साळवी, मनाली पाटील, मंदार केणी आदी उपस्थित होते.

वुमेन्स झोन दिवसभरासाठी सुरु राहणार

स्व. मुकूंद केणी क्रीडा संकुलातील हा वुमेन्स झोन सकाळी ७ वाजता खुला होणार असून दिवसभरासाठी सुरु राहणार आहे. अशा पद्धतीने एखाद्या क्रीडा-उद्यानामध्ये महिलांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असल्याने मंदार किणे यांचे कौतूक होत आहे.