रोबोश्रेष्ठ जग?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा अतिरेक झाला तर मानवजातीवर यंत्रमानव मात करतील व त्यांच्यात उत्क्रांती आपल्यापेक्षा वेगाने घडेल,

th03कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा अतिरेक झाला तर मानवजातीवर यंत्रमानव मात करतील व त्यांच्यात उत्क्रांती आपल्यापेक्षा वेगाने घडेल, अशी भीती प्रख्यात विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केली आहे. मूरचा नियम लक्षात घेतला व तंत्रज्ञानाची घातांकी वाढ पाहिली, तर २०४५ मध्ये सिंग्युलॅरिटी हा टप्पा साधला जाईल, तो धोकादायक असेल असे मत संशोधक रे कुर्झवेल यांनी व्यक्त केले आहे, पण हा धोका प्रत्येक तंत्रज्ञानाच्या बऱ्या-वाईट वापरावर अवलंबून आहे म्हणूनच या खेळाची सूत्रे यंत्रमानवांच्या हातात जाणार नाहीत याची मानवाला काळजी पडली आहे. फार आयतेपणाकडे (आटोमेशन) झुकणे चुकीचे आहे. आजची सोय ही उद्याचे मरण ठरेल. काही वैज्ञानिकांच्या मते यंत्रमानव आपल्यावर मात करू शकणार नाहीत कारण त्यांची बुद्धी झुरळाइतकीही नाही, पण हॉकिंग यांच्या मतामुळे यंत्र आपल्यावर राज्य करणारे रोबोश्रेष्ठ जग अस्तित्वात येण्याची भीतीचर्चा जोमाने सुरू झाली आहे. या निमित्ताने एका नव्या विषयाची चर्चा येथे करण्याचा प्रयत्न..

आठवडा झाला असेल जगातील विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी जगाला असा इशारा दिला की, एक दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली यंत्रे मानवाचाच घात करतील. यापूर्वीही जगप्रसिद्ध कृत्रिम बुद्धिमत्तातज्ज्ञ एलन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये असा इशारा दिला होता, त्यावरून मानवजातीपुढे कृत्रिम बुद्धिमत्ता हेच खरे आव्हान असल्याचे त्यांना म्हणायचे आहे. यापूर्वीही मार्क शेली या लेखिकेने फ्रँकन्स्टाईन या कादंबरीत हीच भीती व्यक्त केली आहे. अगदी अलीकडच्या ‘टर्मिनेटर’ चित्रपटातही हीच भीती व्यक्त करण्यात आली आहे.

षड्रिपु चिकटतील
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रगती वेगाने चालू आहे. काही संगणक संशोधन संस्था त्यावर वेळ व पसा खर्च करीत आहेत. संगणकाला माणसासारखे बनवणे यातच त्यात काय घातक आहे हे सर्वाना कळले असेल. माणसाला असलेले क्रोध, मद, मत्सर, मोह हे सर्व षड्रिपु यंत्रमानवालाही चिकटतील, एवढेच नव्हे तर कालांतराने तो स्वत:च उत्क्रांत होत जाईल अशी ती संकल्पना आहे. मानव-यंत्रमानव प्रेम, लंगिक संबंध असले सगळे प्रकार त्यात आहेत. या यंत्रमानवांमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील व आपण बेकार होऊ.

नैसर्गिक भाषा शिकवण्याचे प्रयत्न
न्यूअन्स व आयपीसॉफ्ट या कंपन्यांनी संगणकाला नसíगक भाषा शिकवण्याचे प्रयत्न केले. इझी ऑप (येसऑप) या फ्रेंच कंपनीने अमेरिकेतील कंपन्यांसाठी असे सॉफ्टवेअर तयार केले आहे जे नसíगक भाषा समजण्याचा प्रयत्न करते. नॅरेटिव्ह सायन्स या कंपनीने फोर्बस्साठी लिहिणारे व दृष्टी असलेले यंत्रमानव तयार केले. असोसिएटेड प्रेसने केवळ माहितीच्या आधारे बातमी लिहिणारे सॉफ्टवेअर तयार केले, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन रॉशर यांनी म्हटले आहे.

यंत्रमानव व मानवाचा संपर्क
th05कृत्रिम बुद्धिमत्तेत मानव व यंत्र यांचा संपर्क पहिल्यांदा अ‍ॅपल कंपनीने आणला. त्याला सिरी जनरेशन असे म्हणतात, कारण त्या संगणकरूपी यंत्राला सिरी पर्सनल असिस्टंट असेच म्हटले जाते. मायक्रोसॉफ्टने नसíगक भाषेचे संस्करण सुरू केले व ते यंत्रमानव त्या भाषेत माणसाशी संवाद करू लागले. गुगलने माणसाला ‘टॉप ऑप्शन’च्या माध्यमातून त्यांच्याशी बोलायला संधी दिली. सिरी व त्याचे पूर्वज हे खऱ्या अर्थाने कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले नव्हते. भाषेचे नसíगक संस्करण म्हणजे यंत्राला माणसाशी संवाद करता येईल अशी भाषा तयार करणे. गेल्या पन्नास वर्षांत त्यात प्रगती झाली पण ती कमी आहे. सिरीच्या आवाज ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर काम करणारे चार्लस ओरटिझ यांनीच हे सांगितले आहे की, ही प्रगती फार नाही. तुम्ही सिरीला आजूबाजूच्या भागातील रेस्टॉरंट शोधण्यास सांगितले असता सिरी फार काही करू शकला नाही, थोडक्यात त्याला ठोस उत्तर देता आले नाही.

माहितीच्या विश्लेषणासाठी वापर
आता तुम्ही व्हेटोलिन डॉट कॉम हे संकेतस्थळ बघितले तर ग्राहक त्यावर, साध्या इंग्रजीत प्रश्न विचारतात व त्याला डॉक्टर किंवा हेअरस्टायलिस्टच्या रूपात उत्तरे दिली जातात. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच प्रकार आहे. यात सॉफ्टवेअर हे इंटरफेस इंजिनवर अवलंबून असते. या संगणक आज्ञावलीने ग्राहकांच्या बोलण्यातून मिळालेल्या माहितीचा सारांश हे यंत्रमानव कंपनीला तयार करून देतात. आताच्या काळात माहिती मिळवणे अवघड नाही. त्याचे विश्लेषण अवघड आहे तेच येथे केले जाते. त्यामुळे माणसाचे काम सोपे होते. आता ही सर्व उदाहरणे पाहिली की, या यंत्रांना स्वत:ची बुद्धिमत्ता आहे अशातला भाग नाही. अमेलिया ही स्वायत्त नाही. तिला माणसाकडून संदेश लागतात. हॉकिंग व मस्क जे म्हणतात ती प्रचंड बुद्धिमत्ता व ती कृत्रिम पद्धतीने वाढत जाणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य दिसत नाही. सध्या तरी यंत्रमानवांची आपल्याला मदत होते आहे.

थोडीशी अतिशयोक्ती
‘२००१- स्पेस ओडिसी’ या चित्रपटात एचएएल ९००० हा यंत्रमानव जरा वेडपट असतो तो माणसावर हल्ला करतो व त्याच्या मालकांना आसमान दाखवतो. ‘टर्मिनेटर’ या चित्रपटात यंत्रमानवाला ज्या महिलेच्या मुलाने यंत्रांना संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या महिलेला ठार करण्यासाठी पाठवले जाते. अर्थात या कल्पना आहेत. अजून तरी कृत्रिम बुद्धिमत्तेची प्राथमिक रूपे आहेत. हॉकिन्स यांच्या मते ही यंत्रे पुढे हीच बुद्धिमत्ता घेऊन उत्क्रांत होतील. बाटलीतून निघालेल्या जिनी राक्षसारखी मानवजातीला नष्ट करतील.

इथेही ती त्याला सांभाळून घेते..
th02जेव्हा आपण कामावर जातो तेव्हा यंत्राशी संबंध ठेवणे जरुरीचे असते. न्यूयॉर्कच्या आयपीसॉफ्ट तंत्रज्ञान कंपनीने आकलन असलेला ज्ञानाधिष्ठित कामगार यंत्राच्या रूपात बनवला आहे, त्याचे नाव अमेलिया असे आहे. बकेर ह्य़ुजेस व शेल यांचे असेनश्युअर हे सॉफ्टवेअर हा यंत्रमानव चालवतो. आता अमेलिया या स्त्री यंत्रमानवाचं रूप बघाल तर सुंदर केस, छान चमक असे आहे. सहा वर्षांच्या मुलीचा आभास आहे. मानवी भावनांचा एक पट त्याला आखून दिला आहे, त्याच्या आधारे तो मानवाशी संपर्क साधतो असे आयपोस्टचे मार्टनि ग्रिबानू म्हणतात. माणूस चिडला तर अमेलिया त्याला सांभाळून घेते. जर तिला एखादा प्रश्न सोडवता आला नाही तर माणसाला बोलावते. तो कशी दुरुस्ती करतो हे पाहते. अमेलियाला टाइप करून प्रश्न विचारले तर ती संदेश मोडून त्याचा अर्थ लावते व संभाषण सुरू करते, उत्तरे देते. सहा वर्षांच्या मुलीने हे करणे अपेक्षित आहे. शेल कंपनीत ही अमेलिया अंतर्गत प्रशिक्षणाची निर्मिती करते असे असेनश्युअरच्या सायरिली बॅटलर सांगतात.

बोलणाऱ्या व भावना असणाऱ्या मोटारी..
मोटारी कधी बोलू शकतील का, त्यांना भावना असतील का, पण ही चित्रपटकथा राहणार नाही लवकरच तुम्ही बोलत नसाल पण तुमच्या गाडय़ा तुमच्या वतीने बोलतील. अँक ड्राइव्ह हा रोबोटिक्समधला एक गेम आहे. त्यात सूक्ष्म संगणकाच्या मदतीने मोटारी एकमेकांच्या संपर्कात असतात, त्या गाडय़ा त्यांचा मार्ग सांगतात, खरोखरच्या गाडीचे नियंत्रण संगणकाकडे गेल्यासारखेच आहे, असे अँकीचे अधिकारी मार्क पॅलाटुसी यांनी सांगितले. रोबोटिक्समधले तज्ज्ञ असलेल्या पॅलाटुसीयांनी अँकी ड्राइव्ह हा गेम अ‍ॅपल स्टोअर्समध्ये आणला आहे. तो १४९ डॉलरला मिळतो पण त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास
ग्रीक लोकांना यंत्रमानवाची संकल्पना माहीत होती. चिनी व इजिप्शियन अभियंत्यांनी अशी स्वचलित यंत्रे बनवली होती. मानवी विचार ही रूपकात्मक प्रणाली आहे असे अभिजात तत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. १९५६ पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता असा काही शब्द नव्हता. एमआयटी येथे बोधनात्मक वैज्ञानिकांची एक परिषद न्यूहॅम्पशायर येथे डारमाऊथ या महाविद्यालयात भरली होती तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाचा वापर करण्यात आला. मार्वनि मिन्स्की या अमेरिकेतील एमआयटीच्या वैज्ञानिकाने ‘एआय- द युमलटस सर्च फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या पुस्तकात असे म्हटले होते की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा प्रश्न एका पिढीत सुटण्यासारखाच आहे. त्यानंतर १९७४ ते १९८० या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसा वाईट काळ होता, कारण कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणे अवघड होते. आर्थिक निधी मिळवणे अवघड होते. १९८० मध्ये ब्रिटिश सरकारने परत अशा प्रकल्पांना मदत द्यायला सुरुवात केली, त्याचा उद्देश हा जपानशी स्पध्रेशी होता. १९८७ ते १९९३ हा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रयोगांसाठी फार चांगला नव्हता, कारण सरकारी निधी कमी मिळत होता. १९९७ नंतर संशोधन पुढे सुरू झाले व १९९७ मध्ये आयबीएमचा डीप ब्लू हा संगणक आला. त्याने रशियाचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव याला पराभूत केले. २०११ मध्ये आयबीएमने प्रश्न-उत्तर प्रणाली वॉटसन तयार केली त्याला जिओपार्डी या क्विझ शो मध्ये पारितोषिक मिळाले. त्याने ब्रॅड रूटर व केन जिनिंग यांचा पराभव केला. बोलणारा संगणक यीन गुस्टमन चच्रेत नंतर आला. तो खरा माणूस आहे असे त्यांना वाटू लागले. त्याची टय़ूरिंग चाचणीही करण्यात आली होती. ब्रिटिश गणितज्ञ व संगणक वैज्ञानिक अ‍ॅलन टय़ूरिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यास तो यंत्रमानव कृत्रिम बुद्धिमत्तेत उत्तीर्ण होतो, पण ही परीक्षा पद्धती चुकीची आहे असे वैज्ञानिकांचे मत आहे. त्यांच्या मते आता नवीन चाचणी विकसित करणे गरजेचे आहे.

हॉकिंग म्हणतात ते कसे काय होईल
कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणे आपण ड्रोन विमानांच्या रूपाने अगोदरच पाहात आहोत. शत्रूच्या प्रदेशात अचूकपणे प्रवेश करून अनेक शत्रूंना ठार करण्याचे सामथ्र्य त्यात आहे. त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रेही अशी उडवता येऊ शकतात. ब्रिटनमध्ये चालकविरहित गाडय़ा बनवण्याचे तीन प्रकल्प आहेत. म्हणजे आपण प्राणाच्या जोखमीची कामे (उदा. खाणीतील कामे) यंत्रमानवाला देणे ठीक आहे, पण ज्यात फार थोडी जोखीम आहे अशी गाडी चालवण्याची कामे त्यांना देऊ लागलो तर ते अति होईल. थोडक्यात आपण सगळीच कामे कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवत गेलो तर एक दिवस बटन न दाबताही केवळ आज्ञेच्या सामर्थ्यांने संगणकाच्या रूपातील यंत्रमानव क्षेपणास्त्र युद्ध खेळतील. डीप माइंड या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीने गुगलला सेवा देऊ केली आहे, पण त्यासाठी एक अट टाकली आहे ती म्हणजे, याचा वापर लष्करी कामासाठी करायचा नाही. पण तसा तो केला गेला तर काय करायचे, हा प्रश्नच आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जी युद्धे खेळली जाऊ शकतील त्यांचे नियम व नीतिशास्त्र काय असेल याबाबत ‘रोबो वॉर्स द रेग्युलेशन ऑफ द रोबोटिक वेपन्स’ या पुस्तकात दिले आहे. शंभर वर्षांपूर्वी झेक चित्रपट निर्माते कॅरेल कॅपेक यांनी पहिल्यांदा रोबोट (गुलाम) हा शब्द प्रचारात आणला, तर हॉकिंग यांनी उभे केलेले चित्र म्हणजे रोबोटची सेना मानवी सेनेला नामोहरम करून गुडघे टेकायला लावेल असे आहे. रीडिंग युनिव्हर्सिटीचे केविन वॉरविक जे सायबोर्ग होते त्यांनी ‘मार्च ऑफ मशिन्स’मध्ये अशीच भीती व्यक्त केली आहे. आता हॉकिंग यांना भीती स्वचालित ड्रोन विमानांची नाही तर मोठय़ा घातपाताची आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणक एक दिवस अशा एकांत बिंदूवर येतील ज्यात त्यांची उच्च क्षमता वाढून बुद्धिमत्तेचा विस्फोट होईल. आपण तर छोटय़ा-मोठय़ा सगळ्याच गोष्टींचे नियंत्रण म्हणजे अन्नवाटप, पाणीवाटप, वीजवाटप, बँकांचे व्यवहार त्यांच्याकडे दिलेले असेल तर मग आपल्या हातात काही नसेल. तुमचे पाणी बंद करून ही यंत्रे तुम्हाला तहानेने मारू शकतील. त्यासाठी तुमच्यावर शस्त्र उगारण्याचे कारण नाही किंवा ड्रोन विमानाने बॉम्ब टाकण्याची गरज नाही, त्यामुळे तुम्ही यंत्रांच्या राक्षसासमोर गुडघे टेकून उभे राहाल, याचना कराल. अरे मीच तर तुला घडवलं पण त्याला हे समजणार नाही आणि तो तुमचा घास गिळून टाकेल.
अगदी काही वर्षांपूर्वी शेअर बाजार कोसळले होते हे सर्वानाच आठवत असेल तर त्यामागचे कारण संगणकाचे ट्रेडिंग कोसळणे हे होते. अशा पद्धतीने आíथक व्यवहार बंद पाडण्याची ताकद संगणकात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक असलेला रे सोलोमोनॉफ याने १९६७ मध्ये जेव्हा या संकल्पनेचा शोध लावला तेव्हाच त्याने असा इशारा दिला होता की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे यंत्रमानव प्रगत होत जाऊन ते एक दिवस माणसाला गुलाम करू शकतील. त्यामुळे एकप्रकारे स्टीफन हॉकिंग यांनी तेच सांगितले आहे. त्याला भीती दाखवणे म्हणता येणार नाही तर जाणीव करून देणे हे आहे.

चित्रपट

* द मॅट्रिक्स
* द टर्मिनेटर
* मास इफेक्ट (व्हिडिओ गेम)
* वेस्ट वर्ल्ड
* कलोसस – फॉरबिन प्रॉस्पेक्ट
* द स्पेस ओडिसी-२००१
* रोबोट

यंत्रमानवाची आत्महत्या
th04कदाचित विचित्र वाटेल पण एका अ‍ॅण्ड्रॉइड यंत्रमानवाने त्याला फरशी पुसण्याचे सांगितलेले काम करण्याचा राग आला म्हणून आत्महत्या केल्याची घटना ऑस्ट्रियात गेल्या वर्षी घडली आहे. ती यंत्रमानवाची पहिलीच आत्महत्या होती. ऑस्ट्रियन घरातील तो अ‍ॅण्ड्रॉइड घरकाम करीत असे. एकदा त्याला मालकाने काम सांगितल्याने कंटाळा आला. त्यामुळे त्याने तापत्या तव्यावर उभे राहून जाळून घेतले होते. त्या यंत्रमानवाने त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये तसा बदल करूनच हे केले असणार हे उघड आहे. ऑस्ट्रियातील कीर्चडॉर्फ येथे ही घटना घडली होती. तो तापत्या तव्याकडे कसा गेला हे कोडेच आहे, पण ते सॉफ्टवेअरमधील बदलामुळे झाले असावे हे त्याचे एक उत्तर आहे. अशीच हिंसा तो माणसाच्या बाबतीत घडवून आणू शकेल काय, तर त्याला अजून वेळ लागेल. कालांतराने रोबोटचा वापर सेक्ससाठी करता येणार आहे. किंबहुना तुमची भावनिक पोकळी भरून काढणारी तो किंवा ती तुम्हाला मिळेल. ‘ब्लॅक मिरर’ या मालिकेत त्या महिलेचा पती मरतो तेव्हा एका कंपनीकडून रोबोट तयार करून घेतात. तो तिचा जोडीदार बनतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास
* १९५०- आयझॅक अ‍ॅसिमोव्ह यांनी आय, रोबोट हे पुस्तक लिहिले त्यानंतर त्यावर चित्रपटही निघाला.
* १९५०- अ‍ॅलन टय़ूकिंग यांनी कॉम्प्युटेशनिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स हा शोधनिबंध लिहिला.
* १९५६- डार्टमाउथ येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर परिषद त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द रूढ करण्यात आला.
* १९६८-२००१- अ स्पेस ओडिसी’ हे आर्थर सी क्लार्क यांचे पुस्तक व नंतर स्टॅनले कुबरिक यांचा चित्रपट, एचएएल ९००० हा जहाल संगणक.
* १९६०-द फर्स्ट विंटर ऑफ एआय या काळात या विषयावर संशोधनाचा निधी कमी करण्यात आला.
* १९७८- बॅटलस्टार गॅलक्टिका ही विज्ञान मालिका सुरू. सायलॉन हा युद्ध यंत्रमानव.
* १९८४ पहिला टर्मिनेटर चित्रपट आला व स्कायनेट या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने माणसांना मारण्याचा प्रयत्न.
* १९८७ स्टार ट्रेक द नेक्स्ट जनरेशनने अँड्राईड सादर केला त्याचे नाव होते लेफ्टनंट कमांडर डाटा.
* १९९७- आयबीएमचा डीप ब्लूचा संगणक, त्याने बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला हरवले.
* २००१- स्टीव्हन स्पीलबर्गने एआय- आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा चित्रपट काढला.
* २००५- कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सिंग्युलॅरिटी हे संशोधक रे कुर्झवेल यांचे पुस्तक प्रकाशित त्यात २०४५ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला.
* २००५- दर्पा ग्रँड चॅलेंजमध्ये स्टॅनफर्डने तयार केलेले वाहन वाळवंटात विनाचालक १३१ मैल धावले.
* २०११- अ‍ॅपलने सिरी हा पर्सनल असिस्टंट व आयफोन ४ एस आणला.
* २०१२- गुगलने मांजरीला ओळखणारा गुगल ब्रेन तयार केला
* २०१३- ‘हर’ नावाचा चित्रपट गाजला त्यात फिनिक्स नावाचा पुरुष संगणक प्रणालीच्या प्रेमात पडतो. स्कारलेट जॉनसन यांनी या चित्रपटाला स्वरसाज दिला आहे.
* २०१४- ट्रान्सेडन्स हा चित्रपट आला त्यात जॉनी डेप याची भूमिका होती त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधकाचे मन संगणकावर अपलोड केले जाते.
* २०१४ – युजीन गुटसमन युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग येथे टय़ूरिंग ही कृत्रिम बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण.
* २०१४ – नवीन टय़ूरिंग चाचणीची निर्मिती.

शिकवणारा व्हिडिओ
अलदेबरान रोबोटिक्स या कंपनीने स्वमग्नता असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी मानवी संदेशवहन व भावनांचे आविष्करण यांचे ज्ञान व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे. त्याचाही संबंध मानव-यंत्र यांच्या इंटरफेसशी आहे.

मला बरे वाटले की, हॉकिंगसारख्या बडय़ा वैज्ञानिकाने अखेर खरी गोष्ट सांगितली. गेली अनेक वष्रे मी हेच सांगत होते. त्यामुळे मानवी कामगिरीपेक्षा सरस कामगिरी करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे यंत्रमानव तयार करणे चुकीचे आहे, तसे केले तर मानवी जीवन एक दिवस त्यांच्या नियंत्रणाखाली जाऊ शकते.
– मानववंशशास्त्रज्ञ डॅनिअली सेरकी, लॉसन विद्यापीठ स्वित्र्झलड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amazing robots in the world

ताज्या बातम्या