कंबोडियातील एक महिला अमेरिकेत आली…या देशाचे नागरिकत्त्व मिळविण्यासाठी तिने नोंदणी केली…आणि विशेष म्हणजे वयाच्या १०३ व्या वर्षी ती अमेरिकेची नागरिक झाली देखील…लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या वृद्धेने अमेरिकेचा झेंडा फडकावत आपण अमेरिकन नागरीक झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.

ही महिला वयाच्या ९७ व्या वर्षी आपली मुलगी आणि इतर नातेवाईकांकडे अमेरिकेत आली होती. या वृद्धेची मुलगी ८० वर्षांची असून तिला अमेरिका आणि कंबोडियामध्ये एकूण ३० नातवंडे आहेत. या महिलेचे नाव हॉंग इंहे आहे. तिने अमेरिकन नागरिकत्त्वाची शपथही घेतली. यावेळी आपल्याला खूप आनंद झाला असल्याचे मत तिने व्यक्त केले.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

१९७० मध्ये झालेल्या युद्धाच्यावेळी अतिशय कठिण प्रसंगांना तिने तोंड दिले असल्याचे तिच्या नातीने सांगितले. ती म्हणाली त्यावेळी अनेकदा युद्धपरिस्थितीमुळे तिला उपासमारीच्या समस्येलाही सामोरे जावे लागले असल्याचे ती सांगते. तिला कायम अमेरिकेत यायचे होते याचे कारण म्हणजे आपणही शांत देशात आपले जीवन व्यतीत करावे अशी तिची इच्छा होती आणि अखेर ती पूर्ण झाली. आता आम्ही तिच्यासोबत अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकू असे तिच्या नातवंडांनी एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले.