जगातील सर्वोत्तम विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचा आनंद काय असतो, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मग सध्या सोशल मीडियावर होत असलेला हा व्हिडिओ पाहा. जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावरही हसू येईल.

आर्यटॉन लिटल असं या १६ वर्षांच्या मुलाचं नाव आहे. तो टीएम लँडरी कॉलेजमध्ये शिकतो. या महाविद्यालयातून गेल्या तीन वर्षांपासून एका विद्यार्थ्याला उच्चशिक्षणासाठी हार्वर्ड विद्यापीठात पाठवलं जातं. तो विद्यार्थी कोण असेल ही धाकधुक सगळ्यांच्या मनात होती. तेव्हा सगळेच आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर डोळे लावून बसले होते. आर्यटॉनला विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचं निश्चित झालं. हे कळताच आर्यटॉनबरोबर तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांनी आनंदाच्या भरात जो कल्ला केला तो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य खुलेल.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळ्यांची भरभरून पसंती या व्हिडिओला लाभली आहे.