एका रिक्षाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक काळजी घेत आहेत. अत्यवश्यक कामासाठी घराबाहेर पडावं लागणाऱ्या नागरिकांसाठी ही रिक्षा वरदान ठरु शकते. या रिक्षामध्ये WiFi, सॅनिटायझर, बेसीन आणि झाडंही आहे. याचा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहलेय की, करोना विषाणू स्वच्छ भारत या मोहिमेला चालना देतोय. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर रिक्षाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दिसतेय की, रिक्षामध्ये सॅनेटायजर, वाशबेसिन, Wifi, झाडेही लावलेली आहेत. रिक्षात गरजेची प्रत्येक गोष्ट आहे. इतकेच नाही तर रिक्षात दोन्ही बाजूला कोरडा कचर आणि ओला कचरा जमा करण्याची सोयसुद्धा केली आहे.

आनंद मंहिंद्रा यांनी दहा जूलै रोजी आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केलं होतं. आतापर्यंत एक मिनिटांच्या या व्हिडीओला चार लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.