News Flash

Video : …आणि फिल्डर बाउंड्री लाईनच विसरला! नक्की काय घोटाळा झाला!

बांगलादेशचा फिल्डर तमीम इकबाल याने बाऊंड्री लाईनवर केलेला हा अजब घोटाळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

...आणि तमीम इकबालला झालेला गोंधळ लक्षात आला!

क्रिकेट विश्वात आजपर्यंत भन्नाट फिल्डींगचे अनेक नमुने आपण पाहिले आहेत. मग तो बाऊंड्री लाईनवर जाणारा सिक्स अप्रतिम कॅच पकडून विकेटमध्ये रुपंतरीत करणं असो किंवा लांबून फिल्डरनं केलेल्या थेट थ्रोमुळे झालेला अकल्पित रन आऊट असो. त्यामुळे डोळ्यांचं पारणं फेडणारी फिल्डींग आपण अनेकदा पाहिली आहे. मात्र, त्याचसोबत वाईट किंवा चुकीच्या फिल्डींगचे देखील नमुने आपल्याला पाहायला मिळतात. बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या ढाका प्रिमियर लीगच्या एका सामन्यामध्ये असाच एक भन्नाट प्रकार दिसून आला आहे. बांगलादेशचा फलंदाज तमीम इकबाल फिल्डींग करताना चक्क बाऊंड्री लाईनच विसरला होता! जेव्हा थ्रो करण्यासाठी त्यानं हात उचलला, तेव्हा त्याला आपण बाऊंड्री लाईन पार केल्याचा साक्षात्कार झाला! एका नेटिझन्सनं ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

नेमकं झालं काय?

बांगलादेशमध्ये ढाका प्रिमियर लीग DPL मध्ये मोहमेदान स्पोर्टिंग क्लब विरुद्ध प्राईम बँक क्रिकेट क्लब यांच्यात सुरु असलेल्या सामन्यामध्ये हा प्रकार घडला. तमीम सामन्यादरम्यान लाँगऑनवर फिल्डींग करत होता. चौदाव्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर मोहमेदानचा फलंदाज शाकीब अल हसनने गॅप शोधून चेंडू सीमारेषेकडे टोलवला. मात्र, तमीम इकबालनं अगदी सहजच बॉलपर्यंतच अंतर फारशी हालचाल न करताही पूर्ण केलं. पण तिथेच घोटाळा झाला!

टीम इंडियाच्या लाडक्या ‘भज्जी’नं किचनमध्ये केली कमाल..! पाहा व्हिडिओ

थ्रो करतच होता, इतक्यात…!

तमीम इकबालला चेंडू अडवण्यासाठी फार काही कष्ट करावेच लागले नाहीत. पण चेंडू हातात घेतल्यानंतर तो पुन्हा बॉलरकडे फेकण्याच्या तयारीत असताना तमीमला बाऊंड्री लाईनचाही विसर पडला. बॉल अडवता अडवता आपण बाऊंड्री लाईन ओलांडून पलीकडे गेलो आहोत, हे देखील त्याच्या लक्षात राहिलं नाही. चेंडू फेकण्यासाठी हात उचलल्यानंतर त्याला साक्षात्कार झाला की आपण बाऊंड्री लाईच्या पलीकडे गेलो आहोत. तिथे तमीमने ही बाऊंड्री असल्याचं हाताच्या इशाऱ्यानं सांगितलं.

 

यावेळी बॅट्समन शाकिब अल हसनलाही अपेक्षा नव्हती की ही बाऊंड्री जाईल आणि बॉलर नयीम हसनला देखील अपेक्षा नव्हती की एका रनपेक्षा जास्त रन्स या चेंडूवर घेतला जाईल. मात्र, तिथे तमीम इकबालच्या चुकीमुळे बॅट्समनच्या खात्यात ४ रन्स जमा झाले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 7:37 pm

Web Title: bangladesh fielder tamim iqbal forgets where the boundary is viral video pmw 88
Next Stories
1 राष्ट्रध्यक्षांचं Tweet Delete केल्याने ‘या’ देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला ‘अच्छे दिन’?
2 Video : चालत्या बसला हाताने थांबविण्याचा प्रयत्न करत होता ‘सुपरमॅन’; बसच्या धकडेमुळे पडला खाली
3 Viral Video : …अन् अवघ्या काही क्षणांमध्ये दरीत पडला १८० कोटींचा राष्ट्रीय महामार्ग
Just Now!
X