News Flash

हिंदुस्थान युनिलिव्हरने हिंदू संस्कृतीची केली थट्टा; बाबा रामदेव यांचा आरोप

हिंदुस्थान युनिलिव्हर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे...

हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या धर्म आणि संस्कृतीची थट्टा केल्याचा आरोप योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या कुंभमेळ्याच्या जाहिराताचा संदर्भ देत बाबा रामदेव यांनी असे वक्तव्य केले आहे. बाबा रामदेव यांनी ट्विट करत हिंदुस्थान युनिलिव्हरवर टीका केली आहे.

आपल्यासाठी देश हा परिवार आहे. पण हिंदुस्थान युनिलिव्हरसाठी आपला देश म्हणजे फक्त एक बाजार आहे. आजही देशातील ५० लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेवर या विदेशी कंपन्यांचे वर्चस्व आहे. अशा विदेशी कंपन्यांना इंग्रजाप्रमाणे भारतातून हद्दपार करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असे ट्विट बाबा रामदेव यांनी केले आहे.

ट्विट करताना बाबा रामदेव यांनी #BoycottHindustanUnilever हा हॅशटॅगही वापरला आहे. बाबा रामदेव यांच्या या ट्विटरवर नेटीझन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर लोकांनी #BoycottHindustanUnilever हे कॅम्पेन राबावल्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हरने आधीचे ट्विट डिलिट करत सुधारित ट्विट केले आहे.

 काय होतं ट्विट? – कुंभमेळा असे ठिकाण आहे, जिथे वयोवृद्धांना सोडले जाते. आपण आपल्या लोकांची साथ सोडतो हे दुख:द नाही का ? ज्यांच्यामुळे आज आम्ही आहोत अशा व्यक्तींना साथ देण्यासाठी #RedLabel आम्हाला प्रेरणा देते. या कॅप्शनखाली एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सुधारित ट्विट – ज्यांच्यामुळे आज आम्ही आहे, अशा लोकांचा हात पडकण्यासाठी रेड लेबल चहा आम्हाला प्रेरणा देते. #ApnoKoApnao असा हॅशटॅग वापरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 4:48 pm

Web Title: boycotthindustanunilever says baba ramdev
Next Stories
1 पत्नी गप्प रहावी म्हणून तब्बल 62 वर्षे मुकबधीराचं सोंग करणारा महाभाग
2 VIDEO: ट्रम्प टीम कूकला ‘टीम अॅपल’ म्हणाले अन् ट्रोल झाले
3 Video : नीता अंबानींचे मराठीतील भाषण ऐकलं का?
Just Now!
X