केरळमध्ये गर्भवती हत्तीणीने फटाके भरलेलं अननस खाल्ल्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले. २७ मे रोजी घडलेली ही घटना वन-अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे उजेडात आली. हत्तीणीच्या मृत्यूची बातमी प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर आल्यानंतर सर्व स्तरातून रोष व्यक्त व्हायला लागला. अनेक लोकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर केरळ सरकारने मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. मात्र या हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक वाद आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. हत्तीणीच्या मृत्यूचं दु:ख वाटतं तर मग गाय, कोंबडी, बकरी अशा सर्वच प्राण्यांच्या हत्येचं दु:ख वाटायला हवं. असे एक ना अनेक मतप्रवाह सध्या ऐकायला मिळत आहेत.

अवश्य वाचा – BLOG : तुम्ही हत्तीचा नाही, माणुसकीचा खून केलात !

हत्तींच्या संगोपनाविषयी काम करणारे आनंद शिंदे यांच्याशी लोकसत्ता.कॉमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. निसर्गचक्रात हत्तीचं महत्व काय आहे आणि हत्ती का वाचवला पाहिजे यावर आनंद शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. पाहा काय म्हणतायत आनंद शिंदे…

दरम्यान, लोकांकडून कारवाईची मागणी होत असल्यानंतर केरळ वन-विभागाने या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे.