News Flash

Viral Video : मध्य रेल्वेच्या कंजुरमार्ग स्थानकावर ‘ती’ नियमीत वाट पाहतेय आपल्या मालकिणीची

ती नेहमीच एका डब्याशेजारी येऊन थांबते

कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आणि माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो. आपल्या धन्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. एकदा या प्राण्यांना माणसांशी लळा लागला की त्यांची साथ ते कधीही सोडत नाही. मध्य रेल्वेच्या कंजुरमार्ग स्थानकावरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्थानकावर एक कुत्री नेहमी कल्याणच्या दिशने जाणाऱ्या लोकलचा पाठलाग करताना दिसते.

ट्रेन आली की एका विशिष्ट महिलांच्या डब्याकडे ही कुत्री धाव घेते. ती नेहमीच एखाद्याची वाट पाहत असल्याचं अनेकांच्या नजरेतून चुकलं नाही. एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानं या कुत्रीचं चित्रिकरण केलं असल्याचं मुंबई मिररनं म्हटलं आहे. ‘ही कुत्री नेहमीच ट्रेनचा पाठलाग करते, ट्रेन थांबली की महिलांच्या डब्याकडे येऊन थांबते. ती एखाद्या व्यक्तीची वाट पाहते हे नेहमीच तिच्याकडे बघून लक्षात येतं.’ असं चित्रिकरण केलेल्या प्रवाशानं संबधित वृत्तपत्राला सांगितलं. या कुत्रीचं वागणं अनेक प्रवाशांच्या मनात कुतूहल निर्माण करतं.

मक्का मशिद परिसरात मुस्लिम महिलांनी खेळ मांडला!

VIRAL : भाजप आणि आपच्या जाहिरातीतील माणसं अगदी ‘सेम टु सेम’!

कदाचित ही कुत्री आपल्या मालकिणीची वाट बघत असावी किंवा तिला मालकानं सोडून दिलं असावं असा निष्कर्ष अनेकांनी काढला आहे. तिच्या एकंदर वागण्यावरून एखादी महिला या कुत्रीला रोज खाणं पुरवत असेल मात्र ती गेल्या काहीदिवसांपासून येत नसल्यानं ही कुत्री तिची वाट बघत असावी असंही म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 11:37 am

Web Title: female dog waits in front of ladies coach on kanjurmarg station
Next Stories
1 मक्का मशिद परिसरात मुस्लिम महिलांनी खेळ मांडला!
2 मुंबईकर उबर युझरची टॅक्सी अरबी समुद्रात ‘भरकटते’ तेव्हा…
3 ऐकावं ते नवलच! लग्नानंतर काही तासांनी नववधूनं दिला मुलाला जन्म
Just Now!
X