20 November 2017

News Flash

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीचा विक्रम; ११ मिनिटे १९ सेकंदात १०३ वेळा अचूक नेम

देशातील सर्वात लहान तिंरदाज

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 11:55 AM

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून हातात धनुष्य घेऊन तिने तिरंदाजीला सुरूवात केली

विजयवाडामधल्या चेरूकुरी डॉली शिवानी या केवळ पाच वर्षांच्या मुलीने नवा विक्रम रचला आहे. ११ मिनिटे १९ सेकंदात १०३ वेळा निशाणा साधून तिने विक्रम रचला आहे. त्यामुळे तिच्या नावाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. शिवानी ही देशातील सर्वात लहान आणि निपुण तिरंदाज म्हणून ओळखली जाते.

तीन वर्षांची असल्यापासून ती तिरंदाजी शिकते. शिवानीचे वडील सत्यनारायण चेरूकुरी हे तिरंदाजी शिकवतात. शिवानीचा भाऊ लेनीन चेरूकुरी हा राष्ट्रीय स्तरावरचा नावाजलेला तिरंदाज होता. दिल्लीत सातवर्षांपूर्वी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो सहभागी देखील झाला होता. पण त्यानंतर काही दिवसातच लेनीनचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर सरोगसीद्वारे शिवानीचा जन्म झाला.

पोलीस दलातील ‘हा’ सिंघम समाजसेवेवर खर्च करतो पगारातील ४० टक्के रक्कम

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून हातात धनुष्य घेऊन तिने तिरंदाजीला सुरूवात केली. तिचे पूर्वज काकतीय सामाज्याचे धनुर्धर होते. धनुर्विद्येची ही परंपरा चेरूकुरी कुटुंबियांनी आजतागायत जपली आहे. शिवानीने २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं तिरंदाजीत प्रतिनिधित्त्व करावं आणि देशाला पदक मिळवून द्यावं असं तिच्या वडिलांचं स्वप्न आहे.

First Published on September 13, 2017 11:55 am

Web Title: five year old archer cherukuri dolly shivani set two new record