News Flash

‘रेनकोट’चा जनक चार्ल्स मॅकिन्टॉशच्या २५०व्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल

प्रयोगशील चार्ल्स यांना रसायनशास्त्रात अधिक रुची होती

आज चार्ल्स मॅकिन्टॉशची २५० वी जयंती आहे आणि त्याला आदरांजली वाहण्यासाठी गुगलने खास डुडल बनवले आहे.

धो धो कोसळणा-या पावसात भिजण्यापासून आपल्याला वाचवतो तो रेनकोट. तसा आपल्यापैकी अनेकांना तो ओल्डफॅशन वगैरे वाटत असला तरी त्याची सर छत्रीला यायची नाही हेही तितकेच खरे. रेनकोट एकदा का चढवला की चिंब भिजवू पाहणा-या सरींशी दोन हात करायला आपण मोकळे. तर हे सारे काही सांगण्यामागचे कारण इतकेच की आज या रोनकोटचा शोध लावणा-या चार्ल्स मॅकिन्टॉशची २५० वी जयंती आहे. त्यामुळे चार्ल्सला गुगलने खास गुगल डुडल बनवून मानवंदना दिली आहे.

VIDEO : आजारातून लवकर बरं होण्यासाठी डॉक्टर महिलाच हवी!- संशोधन

आज गुगल उघडल्यावरच पावसात रेनकोट घालून भिजणारा एका व्यक्ती दिसेल. ही तिच व्यक्ती आहे जिने रेनकोटचा शोध लावला. आज चार्ल्स मॅकिन्टॉशची २५० वी जयंती आहे आणि त्याला आदरांजली वाहण्यासाठी गुगलने खास डुडल बनवले आहे. स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये त्यांचा जन्म झाला. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात फारच रुची होती. वेगवेगळे प्रयोग करण्यात ते नेहमीच व्यस्त असायचे. नाफ्ता हा रबरमध्ये सहजासहजी विरघळतो. यापासून एक पदार्थ तयार होतो जो जलरोधक असतो हे चार्ल्स यांना एका प्रयोगादरम्यान कळले. त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही हे चार्ल्स यांना कळले. जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट त्यांना १८२३ मध्ये मिळाले. पण त्याकाळात त्यांच्यावर आरोपही झाले हा शोध खरं तर त्यांचा नसून सर्जन जेम्स सिम यांच्याकडून त्याने ही कल्पना घेतली असेही आरोप झाले.

वाचा : शेती करण्यासाठी इंजिनिअरने आपली कंपनी विकली

चार्ल्स यांचा हा शोध खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण पावसात स्कॉट नागरिकांचे बाहेर फिरताना हाल व्हायचे. छत्री होती पण ती असून नसल्यासारखीच. तसे जलरोधक कपडे होते पण त्यांचे वजनच खूप असायचे आणि त्याला कुबट वासही यायचा त्यामुळे अर्थात चार्ल्सने शोधलेल्या या नवीन रेनकोटला प्रसिद्धी लाभली नाही तर नवलच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 11:08 am

Web Title: google doodle celebrates 250th birthday of waterproof material inventor charles macintosh
Next Stories
1 अफगाणच्या पहिल्या वैमानिकेने मागितला अमेरिकेकडे आश्रय
2 VIRAL VIDEO : लेटर बॉक्समध्ये दडून बसला विषारी पाहुणा
3 पितृछत्र हरपलेल्या २३६ मुलींचे ‘त्या’ व्यावसायिकाने थाटामाटात लावून दिले लग्न
Just Now!
X