News Flash

सुंदर पिचाईंचं प्रमोशन, एकाचवेळी दोन कंपन्यांचे CEO बनण्याची साधली किमया

जगातील अग्रगण्य सर्च इंजिन गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबत महत्त्वाचं वृत्त

अग्रगण्य सर्च इंजिन ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबत एक महत्त्वाचं वृत्त आहे. पिचाई यांना बढती मिळाली असून ते आता गुगलची पॅरंट कंपनी ‘अल्फाबेट’चेही (Alphabet) CEO झालेत. आतापर्यंत ही जबाबदारी ‘गुगल’चे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्याकडे होती. मात्र, मंगळवारी लॅरी पेज यांनी पदउतार होत असल्याची घोषणा केली. सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी देखील ‘अल्फाबेट’चे अध्यक्ष म्हणून पद सोडण्याचं जाहीर केलंय, त्यामूळे हे पद रद्द करण्यात आलं असून अल्फाबेटच्या सीईओपदाची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्या खांद्यावर आली आहे. परिणामी एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून पिचाई कार्यरत असणार आहेत.

2015 मध्ये गुगलने कंपनीच्या स्वरूपात मोठा बदल करताना अल्फाबेटची स्थापना केली होती. अल्फाबेट ही विविध कंपन्यांचा समूह असलेली कंपनी आहे. अल्फाबेट गुगलला वायमो (चालकरहित कार) व्हेरिली (जैव विज्ञान) कॅलिको (बायोटेक आर एंड डी) आणि लून ( फुग्याच्या सहाय्याने ग्रामीण क्षेत्रात इंटरनेटची उपलब्धता) यांसारख्या इतर संस्थांपासून वेगळं ठेवते. हे सर्व गुगलचे मूळ व्यवसाय नाहीयेत.

नव्या बदलांनंतर सर्गेई ब्रिन आणि गुगलचे दुसरे सह संस्थापक लॅरी पेज कंपनीमध्य सहसंस्थापक, शेअरधारक आणि अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत. दुसरीकडे पिचाई यांना गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांना सीईओ बनवण्यात आलं आहे. यासोबतच पिचाई अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून देखील कायम असतील.

गुगल आणि आता अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी तामिळनाडूच्या मदुराई येथे झाला होता. सुरूवातीचं शिक्षण चेन्नईत घेतल्यानंतर त्यांनी आयआयटी खडगपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. 2015 मध्ये पिचाई यांची गुगलच्या सीईओपदी वर्णी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 12:49 pm

Web Title: google founders larry page sergey brin step down as ceo of alphabet sundar pichai to take over sas 89
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे फ्लशला असतात दोन बटणं!
2 Video: भारतीय लष्कराच्या कॅन्टीनमध्ये हत्ती शिरला आणि…
3 संसदेत चर्चेदरम्यान खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज; व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X