News Flash

Viral Video : देसी नवरदेवाची चक्क ट्रॅक्टरनं लग्नमंडपात एण्ट्री

कॅनडातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

(छाया सौजन्य : Punjabi Sikh Network/ Facebook)

लग्नात नवरदेवाची एण्ट्री कशी एकदम डॅशिंग हवी. सगळ्यांच्या नजरा त्याच्या एण्ट्रीवर खिळल्या पाहिजे. हल्ली घोडीवरून येण्याचे किंवा महागड्या गाडीवरून लग्नमंडपात एण्ट्री करण्याचे दिवस जूने झाले. त्या ट्रेंडपेक्षा काहीतरी हटके करण्याला अधिक पसंती मिळत आहे. तेव्हा कोणी नवरदेव सायकल तर कोणी बुलेटवरून कोणी हेलिकॉप्टर तर कोणी आणखी वेगळ्या स्टाईलनं एण्ट्री घेतो. मागे नाही का पाकिस्तानमधला एका मूर्ख नवरदेव चक्क सिंहाच्या पिंजऱ्यावर बसून लग्नमंडपात आला होता, तर थोडक्यात काय तर सध्या काहीतरी वेगळं करण्याचा जमाना आहे. तेव्हा हाच फंडा लक्षात घेऊन कॅनडामधल्या नवरदेवानं आपल्या लग्नात एकदम हटके स्टाईलनं एण्ट्री घेतली.

वाचा : मध्य प्रदेशमध्ये दोन पुरुषांनी केलं लग्न… कारण वाचून तुम्ही व्हाल हैराण

Viral Video : नवरदेवावर आली गाडीला धक्का मारण्याची वेळ!

वाचा : पायलटच्या चुकीमुळे पाहुणे लग्नमंडपाऐवजी पोहोचले जेलमध्ये!

हा नवरदेव चक्क ट्रॅक्टरनं आपल्या लग्नमंडपाच्या दिशेनं रवाना झाला. ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला वऱ्हाडी मंडळी बसली होती, काहीजण तर रिक्षानंही चालली होती. तेव्हा ट्रॅक्टर, रिक्षा आणि लाऊडस्पीकरवर सुरू असलेली एव्हरग्रीन पंजाबी गाणी वाजवत लग्नमंडपाच्या दिशेनं चाललेल्या या वरातीनं रस्त्यावरच्या अनेकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. ‘पंजाबी शिख नेटवर्क’ या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. तेव्हा तुम्हालाही काहीतरी भन्नाट ट्राय करायचं असेल तर तुम्हीही असं काहीतरी करण्याचा विचार करू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 10:18 am

Web Title: groom enters wedding in a tractor
Next Stories
1 पाण्यात उभे राहून पहारा देणाऱ्या भारतीय जवानांचे फोटो व्हायरल!
2 ‘या’ गोष्टीमुळे गेली शिक्षकांची नोकरी
3 कार चालकांनो सावधान !
Just Now!
X