करोनाच्या या संकटकाळात देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात परस्परभेदाच्या बातम्या येत असतानाही दोन्ही धर्मियांमधील बंधुत्वाचे नाते सांगणाऱ्या घटनाही देशात घडत आहेत. तसेच देशातील विविध भागांमध्ये हिंदू-मुस्लिमांनी परस्परांना मदत केल्याची अनेक उदहारणं आपण पाहिली आहेत. अशातच आता हिंदू मुलीचं मुस्लिम मामानं कन्यादान केल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. माणुसकीचा धर्म, लॉकडाउनमध्ये बंधुभावाचे दर्शन यासारख्या कमेंट करत अनेकजणांनी हा फोटो पोस्ट केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सलाही ऐक्याचं दर्शन करणारा हा फोटो ठेवला आहे.

या भावनिक फोटोला पाहून अनेकांचे डोळे पाणावलं आहेत. एक मुस्लिम मामा आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलींचं कन्यदान कतो. लग्नानंतर सासरी जाताना त्या मुली मामाच्या गळ्यात पडून रडत आहेत. हे पाहून आनेकजन भावनावश झाले आहेत. प्रसिद्ध ब्लॉगर आणि लेखक समीर गायकवाड यांनी या लग्नातील फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, आपल्या भारताचं हे खरं चित्र आहे…

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील हा प्रसंग आहे. येथील सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. गावखेड्यात काबाड कष्ट करत सविता भुसारी यांनी दोन्ही मुलींना मोठे केले. सविता यांना भाऊ नसल्यामुळे घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना त्यांनी गुरू भाऊ मानले आहे. बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली.

हा फोटो पाहून अनेकांना साने गुरुजींची “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” ही उक्ती आठवली असेल. भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. नवऱ्या मुलींची आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही..भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली.. मानवता, प्रेम आणि विश्वास जिथे एकदिलाने नांदतात तिथे व्यवहारातल्या भौतिक बाबी गौण ठरत जातात, असं समीर गायकवाड यांनी लिहिलंय.