23 November 2017

News Flash

हिटलरच्या हाफ पँटला लाखोंची बोली

हाफ पँटची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 11, 2017 6:42 PM

१९३८ साली हिटलर ऑस्ट्रियाच्या पार्क हॉटेल ग्राझमध्ये वास्तव्यास होता यावेळी ही पँट तो तिथेच विसरून गेला होता.

जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर हा ज्यूंचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जायचा. लाखो ज्यूंचा नरसंहार करणारा हा हुकूमशहा त्याच्या मृत्यूनंतरही अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरला. तो कसा होता, त्याच्या सवयी, त्याचं राहणं, स्वभाव अशा एकूण एक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आजही अनेकांना आहे. एखाद्या हुकूमशहावर क्वचितच एवढं लिहिलं गेलं असेल तेवढं लिखाण हिटलरवर करण्यात आलंय. आता याच हिटलरवर पुन्हा एखदा चर्चा ऐकायला मिळत आहेत. अमेरिकेत होणाऱ्या एका लिलावात हिटरलच्या बॉक्सरवर (तोकडी पँट) बोली लावण्यात येणार आहे. याची सुरूवातीची किंमत पाच हजार अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ३ लाख १९ हजारांहून अधिक ठेवण्यात आलीय.

Viral Video : पितृपक्षात कावळ्याला बळजबरीने भरवला जातोय पिंड, सत्य मात्र वेगळंच

ही बोली हळूहळू वाढत जाईन. १९३८ साली हिटलर ऑस्ट्रियाच्या पार्क हॉटेल ग्राझमध्ये वास्तव्यास होता यावेळी ही पँट तो तिथेच विसरून गेला होता. दि. १३ सप्टेंबरपासून या पँटचा ऑनलाइन लिलाव सुरू होईल. चार वर्षांपूर्वी हिटलरच्या ‘माइन काम्फ’ या आत्मचरित्राचा १ लाख अमेरिकन डॉलर एवढ्या किंमतीत लिलाव करण्यात आला होता. हिटरलच्या जवळ असणारी ती एकमेव प्रत होती. १९४५ मध्ये अमेरिकी लष्कराचे लेफ्टनंट बेन लिबेर यांना हिटरलच्या घरात काही वस्तू सापडल्या होत्या त्यात हिटलरची टोपी, शर्ट्स, पदके आणि ‘माइन काम्फ’ची प्रत होती. २०१४ मध्ये या वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. या वस्तूंवर देखील लाखोंची बोली लागली होती.

First Published on September 11, 2017 6:34 pm

Web Title: hitlers white striped linen boxers may fetch 5000 us dollar
टॅग Adolf Hitler