News Flash

Video : रेस्तराँचं छप्पर फाडून आठ फुटांचा अजगर बाहेर आला अन्…

रेस्तराँच्या बाथरुममधील छप्पराचा भाग फाडून अजगर लटकताना दिसला

थायलंडमधील एका रेस्तराँमधील बाथरुमच्या छतामधून चक्क एक आठ फुटांचा अजगर बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडला तेव्हा या बाथरुममध्ये रेस्तराँच्या एक कर्मचारी असल्याने ही गोष्ट लगेच लक्षात आली आणि कोणताही अनर्थ घडला नाही. मात्र या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नक्की पाहा >> Viral Video : वाघाच्या रस्त्यात अजगर आडवा येतो तेव्हा

द सनने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर थायलंडमधील फित्सानीलोक शहरामधील रेस्तराँमध्ये ही घटना घडली. रेस्तराँमध्ये काम करणाऱ्या नोप पोविन याने मागील शुक्रवारी जेव्हा तो बाथरुममध्ये गेला तेव्हा त्याने बाथरुमचं छप्पर तोडून एक मोठा अजगर खाली लटकत असल्याचं पाहिलं. समोरचं दृष्य पाहून नोपला धक्काच बसला. मात्र त्याने आरडाओरड न करता दारात उभं राहून इतरांना आत न येण्यास सांगितलं.

नक्की पाहा >> Video: बिबट्या आणि अजगराच्या झुंजीचा थरार…

नोपने दिलेल्या माहितीनुसार हा अजगर उपाशी होता आणि काहीतरी खाण्याचं शोधत तो वरील सिलिंगमधून आतमध्ये धुसला होता. नोपने आफल्या मोबाईलमधून छताचा भाग तोडून खाली लोंबकाळणाऱ्या अजगराचा व्हिडीओ शूट करुन तो सोशल नेटवर्किंगवर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झालाय.

काही काळ छतामधून खाली लटकल्यानंतर हा अजगर पुन्हा तुटलेल्या छताच्या भागातून वर गेला. त्यानंतर नोपने फोन करुन पोलिसांना तसेच प्राणी मित्रांना यासंदर्भातील माहिती दिली. मात्र त्यानंतर बराच वेळ शोध घेतल्यावरही हा अजगर सापडला नाही. मात्र या रेस्तराँपासून काही अंतरावर एक अजगर पकडण्यात आला. तो हाच अजगर असल्याचं आता सांगण्यात येत आहे.

नक्की पाहा >> Video : जंगलामध्ये सेल्फी काढत असतानाच मागून अस्वल आलं आणि…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 2:36 pm

Web Title: huge python smashes through a toilet ceiling at a restaurant scsg 91
Next Stories
1 आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘जगातील सर्वात वेगवान’ मुलाचा व्हिडिओ, वेग पाहून तुम्हीही व्हाल थक्क
2 ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया सुरु असताना नऊ वर्षाची मुलगी वाजवत होती पियानो
3 ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं; ऑनलाइन याचिका
Just Now!
X