भारत दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू बुधवारी अहमदाबादमध्ये पोहोचले. अहमदाबाद ते साबरमती आश्रम असा भव्य रोड शो केल्यानंतर नेतान्याहू यांनी सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी गांधीजींशी निगडीत गोष्टींची माहीती घेतली. आश्रम पाहून झाल्यावर नेतान्याहू यांनी आश्रमातील अभिप्रायाच्या वहीवर आपली प्रतिक्रियाही नोंदवली. मात्र पंतप्रधान पदावर असणाऱ्या या व्यक्तीकडून यावेळी एक मोठी चूक झाली.

नेतान्याहू यांची ही चूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असून त्याविषयीच्या उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मानवतेचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्त्व महात्मा गांधी यांच्या आश्रमाचे दर्शन अतिशय प्रेरणादायी होते. नेतान्याहू यांनी इंग्रजीमध्ये लिहीलेल्या या संदेशामध्ये त्यांनी गांधी यांच्या नावाचे स्पेलिंग चुकवले. त्यामुळे त्यांना ट्विटरवर नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात आले.