News Flash

कुणाल कामराने राज ठाकरेंसाठी घेतला वडापाव , कारण…

राज ठाकरे यांना वडापावची 'लाच' देण्याचा प्रयत्न...

(छाया सौजन्य - ट्विटर)

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनानंतर चार विमान कंपन्यांनी बंदी टाकल्यामुळे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वडापावद्वारे ‘लाच’ देण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. कुणालने चक्क राज ठाकरे यांना किर्ती कॉलेजच्या वडापावची ‘लाच’ देत आपल्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी विनंती केली आहे. ‘Shut Up Ya Kunal’ या आपल्या युट्यूबवरील लोकप्रिय कार्यक्रमासाठी कुणालने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रित केले आहे.

कुणाल कामराने शिवाजी पार्कजवळ राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर हातात वडापाव घेऊन फोटो काढला आहे. यासोबत, माझ्या कार्यक्रमात हजेरी लावावी यासाठी मनसे अध्यक्षांचं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्याने म्हटलंय. हा फोटो आणि त्यासोबत राज ठाकरेंसाठी लिहिलेलं एक पत्र स्वतः कुणाल कामराने ट्विट केलं आहे. त्या पत्रात, “मी तुमच्याबाबत केलेल्या अभ्यासामध्ये तुम्हाला किर्ती कॉलेजचा वडापाव खूप आवडतो असं कळलं, त्यामुळे तुम्हाला लाच म्हणून तोच वडापाव आणला आहे. किमान आता तरी तुम्ही माझ्या Shut Up Ya Kunal या कार्यक्रमात येण्यासाठी वेळ द्यावी” अशी विनंती कुणालने राज यांना पत्राद्वारे केली आहे.

यापूर्वी, विधानसभा निवडणुकांदरम्यानही कुणाल कामराने राज ठाकरेंना आपल्या कार्यक्रमात येण्याचे आमंत्रण दिले होते. दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणालच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 8:34 am

Web Title: kunal kamra gets kirti college wada pav for mns chief raj thackeray know the reason sas 89
Next Stories
1 तुमच्यासाठी कायपण ! जाणून घ्या न्यूझीलंडने खेळाडू गुलाबी रंगात रंगण्याचं कारण
2 हवा होता युवराज, पदरात पडला ब्रॉड ! महागडं षटक टाकणारा शिवम दुबे ट्रोल
3 आधार क्रमांक असल्यास आता त्वरीत मिळणार पॅन कार्ड; फॉर्म भरण्याची गरज नाही
Just Now!
X