विश्वचषक स्पर्धेत आज ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड सामना रंगणार आहे. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित असलेले हे दोन्ही संघ आपली विजयी घौडदौड सुरु ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. असे असले तरी भारतीय चाहत्यांचे ऑस्ट्रेलियावरुद्धच्या विजयाचे सेलिब्रेशन अद्यापही सुरु असल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे. सामन्याच्या विजयानंतर भारतीय चाहत्यांनी केलेल्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. मात्र त्यातही सर्वाधिक चर्चा आहे ती भोजपूरी गाण्यावर ठेका ठरत भारतीय चाहत्यांनी केलेल्या डान्सची. ‘लगावे तू जब लिपस्टीक’ गाण्यावर नाचणाऱ्या चाहत्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी तो इंग्लंडमधील नसून जर्मनीमधील बर्लिन येथील असल्याचे समोर आले आहे.

रविवारी ऑस्ट्रेलियावरुद्धचा सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. भारताचा हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. त्यामुळेच मैदानात हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भारतीय चाहत्यांनी अगदी मैदानापासून ते मैदानाबाहेरपर्यंत सगळीकडेच या विजयाचे जंगी सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच त्यात ‘लगावे तू जब लिपस्टीक’वर नाचणाऱ्या चाहत्यांचा व्हिडिओही दिसत आहे. हा व्हिडिओ इंग्लंडमधील एका सेलिब्रेशनचा असून ऑस्ट्रेलियावरुद्धच्या विजयानंतर मैदानाबाहेर भारतीय समर्थक जमलेले असतानाच अचानक ‘लगावे तू जब लिपस्टीक’ हे भोजपूरी गाणे सुरु झाले अन् सगळ्यांनी ठेका धरला असा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा झेंडा फडकवत भारतीय चाहते सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. अनेक परदेशी नागरिकांनीही भोजपूरी गाण्यावर ठेका ठरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

मात्र हा व्हिडिओ इंग्लंडमधील नसून तो जर्मनीमधील बर्लिन कार्निव्हलमधील असल्याचे इंटरनेटवर सर्च केल्यावर दिसून येत आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या बर्लीनमधील भारतीयांना आज की पार्टी मेरी तरफ से या गाण्यावर डान्स केला होता. याच व्हिडिओमध्ये बदल करुन भारतीय चाहत्यांचे सेलिब्रेशन म्हणून व्हायरल केला जात आहे. खाली पाहा खरा व्हिडिओ

तरी या व्हिडिओची सत्यता न पडताळता अनेकांना हा खरोखरच भारत ऑस्ट्रेलिया समान्यानंतरचा व्हिडिओ असल्याचे वाटल्याने त्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मी तिथेच होतो

गोष्टी हाताबाहेर चालल्यात

जगात भारी भोजपूरी गाणी

एक बिहारी म्हणून काय बोलावे कळत नाहीय

आता फक्त पानाचे डाग बाकी

दक्षिण भारतीयांची पहिली प्रतिक्रिया

कारण काहीही असले तरी भारतीय गाण्यांवर परदेशी नागरिकांना नाचताना पाहून भारतीय नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत असल्याचेच त्यांच्या प्रतिक्रियेमधून दिसून येत आहे.