महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रा गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कायम पुढे असतात. त्यामुळे रोज त्यांच्याविषयी काही ना काही चर्चा रंगतच असते. तसंच ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे प्रत्येक टि्वट हे चर्चेचा विषय असते. अलिकडेच त्यांनी ट्विटरवर एका आजींचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओने विकेंडचा मूड तयार केल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं.

२०२० हे नवीन वर्ष सुरु झालं असून प्रत्येकानेच नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं. यात आनंद महिंद्रांनीदेखील त्यांचं नवीन वर्ष एका खास व्यक्तीसोबत सेलिब्रेट केलं. यावेळचे त्यांचे फोटोही चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी नवीन वर्षाच्या पार्टीची तयारी करणाऱ्या एका आजीबाईंचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत आजी मस्त त्यांच्याच धुंदीमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

वाचा : स्ट्रीट डान्सर 3D : ‘या’ टिकटॉक स्टारवरुन तयार झाला वरुणचा लूक

“तुमच्याप्रमाणेच अनेकांनी मला व्हिडीओ आणि मेसेजच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यामध्ये हा टॉप पॉप अप व्हिडीओ आहे. मला माहित नाही ही महिला कोण आहे आणि हा व्हिडीओ कुठून आलाय. पण या व्हिडीओमुळे माझा विकेंडचा मूड झाला आहे. त्यामुळे आता मी जेव्हा घरी जाईन तेव्हा सगळ्या पहिले या महिलेने केलेल्या डान्स स्टेप्सची प्रॅक्टीस करेन, असं आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे”.

दरम्यान, हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले आहेत. तसंच त्याच्यावर कमेंटचा पाऊसही पडत आहे.