काळ्या पैशाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असणाऱ्या परिस्थीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या भावना जाणून घेणार आहेत. मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका अॅपच्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. देशातील चलन कलहाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी मोबाईल वापरकर्ते या सर्वेत सहभागी होऊन निर्णयासंदर्भात आपली मते नोंदवू शकतात. ‘एनएम’ अॅप अर्थात नरेंद्र मोदी असे या अॅपचे नाव असून  लोकांनी आपली मते माडांवीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.  नोटाबंदीविषयी सर्वेक्षणासाठी सुरु करण्यात आलेली ही मोहिम गुंतागुतीच्या प्रक्रियेमुळे कितपत यश मिळवेल हे येणारा काळाच ठरवेल.  गुगल स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या अॅपद्वारे काळ्या पैशाच्या लढाईसंदर्भात जनतेचा कौल जाणून घेण्यात येत असून हे अॅप डाऊनलोड  करण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागते. मोदींनी आवाहन केल्यानंतर

पंतप्रधानांना काळ्या पैशासंदर्भातील निर्णयासंदर्भात  व्यक्त होण्यासाठी गुगल स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करताना सर्वप्रथम नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी मोबाईल वापरकर्त्यांना अधिक वेळ द्यावा लागत आहे. या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी अथवा त्यांच्या पंतप्रधानांच्या निर्णयाविरोधात मत नोंदविण्यासाठी  भली मोठी प्रक्रिया असल्यामुळे या अॅपला अधिक प्रतिसाद मिळेल का असा सवाल सध्याच्या घडीला  उपस्थित होताना दिसतोय. सध्याच्या धावपळीच्या काळात सोशल मीडियावर लोक सक्रिय असले तरी अधिक मोठी प्रक्रिया असणाऱ्या सर्वेमध्ये लोक कमी सहभागी होताना अनेक सर्वेतून दिसून आले आहे. त्यामुळे मोदीसरकारच्या या मोहिमेला किती लोक सहभागी होतात  हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या भारतामध्ये काळे धन आहे असे तुम्हाला वाटते का?  आपल्या देशातील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्धच्या लढाई गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते का?  सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? या निर्णयामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागला. या सारखे सवाल विचारण्यात आले असून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाई लढण्यासाठी सूचना देखील देण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. यापूर्वी मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून चांगली लोकप्रियता मिळाली आहे. तसेच  स्मार्टफोनच्या युगात सत्तेत आलेले मोदी सरकार ‘आपले सरकार’ या अॅपच्या माध्यमातून अनेक उपक्रमात जनतेला सहभागी करुन घेताना दिसले आहे.