13 August 2020

News Flash

Viral Video : माकडाला कळले, तुम्हाला कधी कळणार

माणूसही प्राण्यांप्रमाणे का विचार करू शकत नाही? असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत.

पाणी वाचवणाऱ्या माकडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या १४ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये माकडाने मोठा संदेश दिला आहे. वाया जाणारं पाणी थांबवण्याचा प्रयत्न माकड करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

माणूसही प्राण्यांप्रमाणे का विचार करू शकत नाही? असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत. निहारिका सिंग पांजले या खात्यावरून टि्वटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यासाठी झक्कास असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. ‘जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना जर एवढी बुद्धीमत्ता, संवेदनशीलता असेल तर मग मला असा प्रश्न पडतो की, मानव असं का वागतो? आणि खरे प्राणी कोण आहेत? असा प्रश्न तिने टि्वटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ‘


सोशल मीडियावर या व्हिडिओला नेटकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. पाणी वाचवण्याचा हा संदेश हनुमानानेच आपल्याला दिला आहे, अशी प्रतिक्रिया काहीजणांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 2:31 pm

Web Title: monkey uses dry leaves to fix leaking pipe in viral video humans should learn from animals says internet nck 90
Next Stories
1 ‘लिंबू मिरची न लावल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे चाक मातीत रुतले’; फडणवीसांची उडवली खिल्ली
2 VIDEO: पाकिस्तानला फेल करणारं भारताचं ‘सिक्रेट वेपन’
3 Video: रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापौराला गाडीला बांधून नेले फरफटत
Just Now!
X