मोहम्मद कैफ हा भारतीय संघाचा गेल्या काही वर्षातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जायचा. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह या खेळाडूंनी भारतीय क्षेत्ररक्षणाचा स्तर अधिक उंचावून ठेवला होता. आपल्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कैफने भारतीय संघाला अनेकदा असाध्य विजय मिळवून दिले आहेत. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर नेटवेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना हा त्यापैकीच एक….

काही दिवसांपूर्वीच मोहम्मद कैफने आपला जुना सहकारी आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसोबत घेतलेल्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोला कैफने, My Sudama moment with Lord Krishna अशी भन्नाट कॅप्शन देत सर्वांची मनं जिंकली…

सचिन आणि कैफ यांनी एकत्र अनेक सामने खेळले आहेत. ७४ वन-डे आणि ५ कसोटी सामने सचिन आणि कैफ एकत्र खेळले. भारतीय संघाकडून कैफची कारकिर्द फारशी उल्लेखनीय नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेथनीय राहिलेली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये कैफच्या नावावर २५ शतकं, १२५ अर्धशतकांसह १९ हजार धावा जमा आहेत.